cotton purchase in Akola district from today
cotton purchase in Akola district from today 
मुख्य बातम्या

अकोला जिल्ह्यात 'पणन'ची आजपासून कापूस खरेदी 

टीम अॅग्रोवन

अकोला ः जिल्ह्यात कापूस केंद्रावर शुक्रवार (ता. २४) पासून खरेदी सुरू केली जात आहे. सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत या केंद्रावर कामकाज चालणार आहे. विक्रीपूर्वी शेतकऱ्यांना नोंदणी करणे गरजेची असून यासाठी आता ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल कापूस विक्री व्हायचा असून पणन महासंघ व सीसीआयने कापूस खरेदी तत्काळ सुरू करावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यापासून सुरू असलेली खरेदी बंद करण्यात आलेली आहे. आता लॉकडाऊनमध्ये या भागात थोडी शिथिलता असल्याने पुन्हा खरेदी सुरू केली जात आहे. 

पणन महासंघाची जिल्ह्यातील केंद्र शुक्रवारपासून सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. यासाठी अटी घालून देण्यात आल्या. त्यात प्रामुख्याने कापूस खरेदी फक्त अकोला जिल्ह्यातील पणन महासंघाकडे नोंदणी झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडील खरेदी केला जाईल. यासाठी रहिवास पुरावा द्यावा लागेल. 

शेतकऱ्यांना सातबारा, बॅंक पासबुक, आधारकार्ड सोबत ठेवावे लागेल. पणन महासंघाच्या बोरगावमंजू केंद्रावर ६८५ तर कानशिवणी केंद्रावर ४२३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांकडील कापूस खरेदीनंतरच पुढील नोंदणी सुरू करण्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्येक खरेदीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे. गर्दी टाळण्यासाठी खरेदी केंद्रावर टप्प्या टप्प्याने शेतकरी येतील असे नियोजन करण्याचे जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी निर्देश दिले आहेत. 

या विभागात सीसीआयच्या वतीने कापूस खरेदीसाठी केंद्र सुरू केले जात आहेत. कोरोनामुळे विशेष खबरदारी घेत सोशल डिस्टन्सिंग पाळत खरेदी केली जात आहे. जिल्ह्यात एक केंद्र सुरू झाले. टप्याटप्प्याने इतरही ठिकाणी खरेदी सुरू केली जाईल. सध्या शेतकऱ्यांना नोंदणीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत दिलेली आहे.  - अजयकुमार, जनरल मॅनेजर, सीसीआय

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT