cotton procurement
cotton procurement  
मुख्य बातम्या

वाहतूक भाड्याचा भुर्दंड; केंद्रचालकांचा गलथानपणा सुरूच

टीम अॅग्रोवन

जळगाव : खानदेशात कापूस महामंडळ (सीसीआय) व पणन महासंघाची कापूस खरेदी काही केंद्रांमध्ये सुरू आहे. या केंद्रांमध्ये कापूस विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना टोकन दिले जात नसल्याने त्यांना जादा वाहतूक भाड्याचा भुर्दंड व रांगेत थांबण्याचा केंद्रातील मुक्कामाचा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. यात त्यांना आर्थिक फटका बसत आहे.  यासंदर्भात नंदुरबार येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृष्णदास पाटील, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे शशिकांत भदाणे, गुलाबसिंग गिरासे, कडूअप्पा पाटील, ईश्‍वर लिधुरे आदींनी निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की कापूस खरेदी खानदेशात पुन्हा सुरू झाली आहे. सीसीआयची खरेदी नंदुरबार, धुळे व जळगावात सुरू आहे; तर पणन महासंघाची जळगाव जिल्ह्यात खरेदी सुरू आहे. काही केंद्र अजून बंदच आहेत. पूर्ण केंद्र सुरू नाहीत. काही केंद्रांमध्ये आता कापूस विक्रीसाठी मोठी गर्दी होईल. कारण बाजारात कापसाचे दर ४८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. त्याचा फटका बसत असल्याने शासकीय कापूस खरेदी केंद्रात शेतकरी कापूस विक्रीसाठी येत आहेत. या केंद्रात मात्र शेतकऱ्यांना टोकन दिले जात नाहीत.  टोकन दिले तर शेतकरी ज्या दिवशी कापसाची संबंधित केंद्रात तोलाई होईल, त्याच दिवशी कापूस विक्रीसाठी आणतील. यामुळे वाहनांच्या रांगाही केंद्रात लागणार नाहीत. केंद्रचालक काही वेळेस दिवसभरात ५० किंवा ६० वाहनांमधील कापसाचीच तोलाई किंवा लिलाव व नंतर खरेदी करतात. जेवढी तोलाई, खरेदी करायची असते, तेवढ्याच शेतकऱ्यांना रोज टोकन दिले तर केंद्रासमोर रांगा लागणार नाहीत. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. रांगांमुळे अनेकदा केंद्रात शेतकऱ्यांमध्ये वाद होतात. वशिलेबाजीचे आरोप होतात. हे प्रकार टाळण्यासह शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये यासाठी टोकन दिले जावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.  येथे लागतात रांगा  जळगाव, पारोळा, अमळनेर, जामनेर, नंदुरबार, शहादा, शिरपूर येथील केंद्रात टोकनअभावी वाहने, बैलगाड्यांच्या रांगा लागतात. दोन ते तीन दिवस रांगेत वाहने असतात. यात ट्रॅक्‍टर किंवा भाड्याच्या बैलगाडीसंबंधी शेतकऱ्यांना हकनाक भाडे द्यावे लागते. प्रतिदिन दोन ते दीड हजार रुपये भाडे असते. शिवाय जेवण, चहा आदींचा रोजचा खर्चही करावा लागतो. यामुळे आर्थिक फटका बसतो. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

SCROLL FOR NEXT