कापूस
कापूस  
मुख्य बातम्या

डॉलर वधारल्याने कापूस बाजार सावरला

Chandrakant Jadhav

जळगाव ः रुपयाच्या तुलनेत डॉलरचे वधारते दर, न परवडणारी आयात व निर्यातीसंबंधीचे वाढते सौदे यामुळे देशांतर्गत बाजारात ३५ ते ३७ मिलिमीटर लांब धाग्याच्या रुईचे दर उच्चांकी पातळीवर पोचले असून, किमान ६१ हजार रुपये खंडी (३५६ किलो रुई) असे दर ३५ व ३७ मिलिमीटर लांब धाग्याचा कापूस म्हणून ओळख असलेल्या नूवीन व डीसीएच प्रकारच्या रुईला देशांतर्गत बाजारात मिळत आहेत.   

रुपयाचे दर डॉलरच्या तुलनेत नीचांकी पातळीवर पोचल्याने २९ मिलिमीटर लांब धाग्याच्या रुईचे दर सात टक्‍क्‍यांनी वधारून ते ४८ हजार रुपये प्रतिखंडी, असे झाले आहेत. तीन आठवड्यांपूर्वी अमेरिकन कापूस वायदा बाजार ९४ सेंटवरून ८७ सेंटवर खाली आला. मागील आठवड्यात अमेरिकन बाजार ८२ सेंटवर स्थिरावला. चीन व अमेरिका यांच्यातील व्यापार युद्धामुळे चलन बाजारावर परिणाम दिसून येताच कापूस बाजारही घसरू लागला. डॉलर मात्र वधारून तो ७०.२१ रुपये, अशा दरांवर पोचला. यामुळे ४७५०० रुपये खंडीपर्यंत खाली आलेले रुईचे दर ४८००० रुपयांपर्यंत पोचले आहेत. निर्यातीसंबंधी नफ्याचे सौदे होत आहेत, परंतु भारतात अल्प प्रमाणात पिकणाऱ्या लांब धाग्याच्या (३५ मिलिमीटर) पिमा व गिझा प्रकारच्या कापसाची आयात देशांतर्गत मिलांना परवडत नाही. 

ऑस्ट्रेलिया, अमेरिका व तुर्की येथून पिमा व गिझा प्रकारच्या गाठींची आयात करायची असल्यास प्रतिखंडी ७१ ते ७२ हजार रुपये दर पडत आहे. पहिल्या दर्जाचे सूत निर्मिती व ब्रॅण्डेड कपडे निर्मितीसाठी या लांब धाग्याच्या कापसाची गरज मिलांना काही प्रमाणात असते. ही गरज देशांतर्गत बाजारात पूर्ण करणे शक्‍य असल्याने देशांतर्गत बाजारात त्यासंबंधीचे सौदे सुरू असून, त्यांना यंदा उच्चांकी ६१ हजार रुपये प्रतिखंडी, असा दर आहे. 

नूवीन प्रकारचा कापूस किंवा रुई फक्त तामिळनाडू व ओरिसालगत उपलब्ध होत आहे. या भागात सुमारे १० हजार गाठींचे (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन यंदा झाले आहे. हा कापूस ३७ मिलिमीटर लांबीचा असून, पिमा व गिझासारखाच दर्जा त्यात मिळत आहे. तर डीसीएच प्रकारचा कापूस किंवा रुई मध्य प्रदेशातील रतलाम व परिसर आणि महाराष्ट्रातील सिल्लोड, कन्नड (जि. औरंगाबाद) भागात उपलब्ध होत आहे. डीसीएचचे यंदा सुमारे दीड लाख गाठींचे उत्पादन झाले आहे. त्याला चांगले दर मिळत असल्याने यंदा लागवड क्षेत्र संबंधित भागात वाढले आहे. अमेरिकन वायदा बाजारात सुताच्या दरांबाबत थोडी पडझड झाली. परिणामी देशातही उत्तम दर्जाच्या सुताचे दर थोडे दबावात आल्याची माहिती मिळाली.  कापसाला सध्या ५८०० रुपये दर दर्जेदार कापसाला सध्या ५८०० रुपये प्रतिक्विंटलचे दर आहेत. केंद्राने लांब धाग्याच्या कापसाचे दर ५४५० रुपये प्रतिक्विंटल केल्याने दर कमी होणार नाहीत. महाराष्ट्र, पंजाब, हरयाणात या महिन्याच्या अखेरिस वेचणी सुरू होईल. यंदा गुलाबी बोंड अळीचे प्रमाण कमी दिसत आहे, असे जाणकारांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

SCROLL FOR NEXT