थंडी
थंडी  
मुख्य बातम्या

राज्यात हुडहुडी कायम

टीम अॅग्रोवन

पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे किमान तापमानात घट झाल्याने राज्यात हुडहुडी कायम आहे. नगर येथे नीचांकी ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नगरसह, यवतमाळमध्ये थंडीची लाट आली आहे. सोमवारपर्यंत (ता. २४) किमान तापमानात सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता असल्याने थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.   उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीची लाट आली असून, शुक्रवारी (ता. २१) राजस्थानच्या सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर राज्याच्या किमान तापमानात झालेली घट कायम आहे. तापमानाचा पारा १० अंशांपेक्षा खाली आला असेल, आणि कमान तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंशांची घट झाली असेल तर थंडीची लाट आल्याचे समजण्यात येते. नगर येथे तापमानात ५ अंशांची तर यवतमाळ येथे ६ अंशांची घट झाली असल्याने तेथे थंडीची लाट आहे.  नगर आणि यवमाळसह जळगाव, मालेगाव, नाशिक, नागपूर येथे तापमान १० अंशांच्या खाली उतरल्याने थंडीचा कडाका अधिक आहे. तर गोंदिया, औरंगाबादमध्ये किमान तापमान १० अंशावर असल्याने गारठा आहे. राज्यात अनेक ठिकाणी धुके पसरत असून, पिकांवर दवही पडत आहे. किमान तापमानात थोडासा चढ-उतार होत असला तरी सोमवारपर्यंत (ता. २४) राज्यात थंडी कायम राहण्याची शक्यता आहे.   शुक्रवारी (ता. २१) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ११.२ (०), नगर ६.५ (०), जळगाव ८.६ (-२), कोल्हापूर १६.६ (२), महाबळेश्‍वर १३.० (-१), मालेगाव ९.८ (-२), नाशिक ८.३ (-२), सांगली १३.८ (-१), सातारा १३.३ (१), सोलापूर १६.० (१), सांताक्रूझ १६.० (-३), अलिबाग १७.८ (-१), रत्नागिरी १८.६ (-१), डहाणू १६.५ (-२), औरंगाबाद १०.० (-१), परभणी ११.५ (-२), उस्मानाबाद १४.०, अकोला ११.२ (-३), अमरावती ११.८ (-३), बुलडाणा ११.४ (-३), चंद्रपूर १०.६ (-२), गोंदिया १०.२ (-२), नागपूर ८.३ (-४), वर्धा ११.२ (-२), यवतमाळ ८.४ (-६).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT