चेन्नई पुन्हा जलमय; अतिवृष्टीचा जबर तडाखा, महामार्ग पाण्याखाली 
चेन्नई पुन्हा जलमय; अतिवृष्टीचा जबर तडाखा, महामार्ग पाण्याखाली  
मुख्य बातम्या

चेन्नई पुन्हा जलमय; अतिवृष्टीचा जबर तडाखा, महामार्ग पाण्याखाली 

वृत्तसेवा

चेन्नई ः तमिळनाडूवर अतिवृष्टीचे संकट घोंघावू लागले असून राजधानी चेन्नईला आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. शहरातील मार्ग जलमय झाल्याने वाहतूक देखील काहीकाळ विस्कळित झाली होती. हवामान खात्याने सावधगिरीचा इशारा दिल्यानंतर गुरूवारी (ता.११) सायंकाळी सहापर्यंत विमानांच्या एंट्रीला ब्रेक लावण्यात आला होता. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आज सायंकाळपर्यंत उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्रप्रदेशच्या दिशेने सरकू शकते त्यामुळे शहरात ताशी ४५ किलोमीटर एवढ्या वेगाने वारे वाहू शकतात, असा इशारा हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. चेन्नईसह अनेक शहरांमध्ये जोरदार पाऊस कोसळू शकतो असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.  बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. राज्यात आतापर्यंत अतिवृष्टीने चौदा लोकांचा बळी घेतला आहे. उत्तर चेन्नई, तिरूवल्लूर, चेंगेलपेट, कांचीपुरम, राणीपेट, विल्लूपुरम आणि कुड्डालोर या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा जबर तडाखा बसला आहे. सध्या सागरामध्ये निर्माण झालेले वादळ उत्तर तमिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या किनाऱ्याच्या दिशेने जाऊ लागले आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने हायअलर्टचा इशारा दिला आहे. वादळी वाऱ्यांसह कोसळलेल्या या पावसामुळे चेन्नईतील अनेक महामार्गांचे मोठे नुकसान झाले असून अनेक उपमार्ग देखील पाण्याखाली गेले आहेत. स्थानिक पातळीवर मदत आणि बचाव कार्याला वेग येऊ लागला असून निमलष्करी दलांनी बचाव कार्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

प्रतिक्रिया... चेन्नईमधील संततधार कोसळणारा पाऊस हे चिंतेचे कारण असून सर्वांनीच सुरक्षेच्या उपायांचे पालन करावे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याकामी पुढाकार घ्यावा.  - राहुल गांधी, नेते काँग्रेस 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT