Buy cotton before monsoon: MLA Bhuyar
Buy cotton before monsoon: MLA Bhuyar 
मुख्य बातम्या

माॅन्सूनपूर्वी करा कापसाची खरेदी ः आमदार भुयार

टीम अॅग्रोवन

अमरावती ः वरुड तालुक्‍यात लॉकडाऊनमुळे सीसीआय तसेच पणन महासंघाची खरेदी प्रभावीत झाली होती. आमदार देवेंद्र भुयार यांच्या पाठपुराव्यामुळे चार जिनींगमध्ये पुन्हा कापूस खरेदीचा प्रारंभ झाला. यावेळी कापूस उत्पादकांचा शाल, श्रीफळ देत सत्कार करण्यात आला.

शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून असतानाच कोरोनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कापूस खरेदी प्रभावीत होत अखेर बंदच झाली. त्यामुळे खरिपाकरिता पैशाची सोय करण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले होते. वरुड तालुक्‍यातही सीसीआयची खरेदी बंद होती. त्यानंतर काही केंद्रावर ती सुरू झाली तरी वेग कमी असल्याने माॅन्सूनपूर्व सर्व शेतकऱ्यांकडील कापसाची खरेदी शक्‍य होणार नव्हती. शेतकऱ्यांनी हा मुद्दा आमदार भुयार यांच्याकडे मांडला.

उन्हाळा वाढता असल्याने कापसाच्या वजनात घटीचे प्रमाणही वाढली आहे. त्याचाही फटका कापूस उत्पादकांना बसणार असल्याचे यावेळी सांगणात आले. याची दखल घेत चारही जिनींगवर कापूस खरेदी व्हावी याकरिता सीसीआयकडे पाठपुरावा केला. सीसीआयकडून त्यानंतर चार जिनींगवर कापूस खरेदीची सुुरुवात करण्यात आली. अभिषेक कॉटन फायबर येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते कापूस खरेदीच्या सुरुवातीला कापूस उत्पादकाचा शाल, श्रीफळ देत सत्कार करण्यात आला.

यावेळी संचालक मुरलीधर श्रीराव, अजय पांडव, अमोल बहूरुपी, प्रकाश गोहत्रे, किलाचद खनखणे, गणेश घोरमाड, प्रशांत राऊत, अनिल खंडार, शुभम ठाकरे उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

SCROLL FOR NEXT