अकोला ः मुंबई येथून एसटी बसने प्रवास करत बुलडाणा येथे अालेल्या रविकांत तुपकर यांच्या स्वागतासाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
अकोला ः मी माझ्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त करून मोकळा झालाे अाहे. अाता कुणी काहीही म्हणो. अामचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या १० सप्टेंबरपासून अमरावतीतून राज्यव्यापी दौरा सुरू करीत अाहोत. सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या प्रश्नांवर अांदोलन उभे करणे व संघटना बांधणीसाठी हा दौरा असेल, असे रविकांत तुपकर यांनी सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एनडीएसोबत काडीमोड घेतानाच संघटनेला मिळालेले वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्षपदही त्यागले. रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवून खुर्चीसह मिळालेला बंगला शासनाला परत केला.
या घडामोडीनंतर बुलडाण्यात परतलेले तुपकर यांनी मुंबई ते पुणे अाणि पुणे ते बुलडाणा असा एसटी बसने प्रवास केला. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली.