शेती झाली विषारी... भाग 5
शेती झाली विषारी... भाग 5 
मुख्य बातम्या

गुणनियंत्रणात कृषी विभाग नापास

Vinod Ingole

शेती झाली विषारी... भाग 5 यवतमाळ : बोंडअळीसोबतच मुख्य पीक सुरक्षीत ठेऊन तणांचे नियंत्रण करणारे नवे तंत्रज्ञान राउंडअप रेडी बिटीच्या चाचण्या सुरू आहेत. चाचणी प्रक्षेत्रावरील हीच बिटी यवतमाळ जिल्ह्यात सर्रास चोर बिटी म्हणून विकल्या गेली. तणावरचा चार हजार रुपयांचा खर्च वाचतो म्हणून गुजरातेतून आयात झालेल्या या बिटीची लागवड मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगीतले जाते.  यवतमाळ जिल्ह्यात ४ लाख ७० हजार हेक्‍टर क्षेत्रावर बि. टी. कापूस आहे. राउंडअपरेडी बियाण्यांचा सोशल मीडियावरून खुलेआम प्रसार झाला. पाकिस्तानमधील हे उत्पादनक्षम वाण असून भारतात याला परवानगी नसल्याचे सोशल मीडियावरील त्या पोस्टमध्ये नमूद होते. या बियाण्याकरिता संपर्कासाठी एका व्यक्‍तीचा मोबाईल क्रमांकही देण्यात आला होता. अमरावती विभागीय गुणनियंत्रण विभागाकडे देखील ही पोस्ट पोचली. त्यांनी कृषी आयुक्‍तालय स्तरावरील गुणवत्ता नियत्रंण विभागाकडे हे प्रकरण चौकशीसाठी पाठविले. मात्र हंगामात सर्वदूर या अवैध बि.टी.ची लागवड झाली, परंतु आजवर कृषी खात्याच्या गुणनियंत्रणाची चौकशी पूर्ण झाली नाही. याप्रकरणी संबंधीत मोबाईल क्रमांकधारकावर देखील कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही किंवा साधी चौकशीदेखील कृषी विभागाने केली नाही. त्यावरूनच अवैध बियाणे आणि निविष्ठांना संरक्षण देण्याचे कृषी खात्याचे धोरणच स्पष्ट होते.  ९०० ते १२०० रुपयांत अवैध बि.टी. बियाण्याचे पाकीट विकल्या गेले. निंदणाचा मजुरी दर २०० रुपये आहे. त्यानुसार एकरी चार हजार रुपयांचा निंदणावरचा खर्च वाचतो म्हणून याची लागवड जिल्ह्यात झाली; पण याकडे देखील स्थानिक, विभागीय आणि राज्यस्तरीय गुणनियंत्रण विभागाचे दुर्लक्ष झाले. कृषी विभागाचा हाच निष्काळजीपणा शेतकऱ्यांच्या जीवावर बेतला.  उत्पादन झालेच कसे  मोदींच्या गुजरातमधूनच राउंडअपरेडी बियाणे पोचले, अशी चर्चा आहे. त्याचे उत्पादनच कसे झाले? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कृषी विद्यापीठांनी भारतीय शेतीलापूरक असे तंत्रज्ञान उपलब्ध कररून दिले नाही. त्यामुळे विदेशी तंत्रज्ञानावर आपल्याला निर्भर राहावे लागले. अमेरिकेत संकरीत वाणाऐवजी सरळ वाणामध्ये बि. टी. आहे. आपल्याकडे मात्र संकरीत वाणात आहे. दरवर्षी बियाणे नंतर खत, कीटकनाशक घ्यावीच लागली पाहिजे आणि शेतकऱ्यांना लुटता आल पाहिजे याकरिता कंपन्यांनी हा पॅटर्न रुजविला. सरकारने देखील सरळ वाणात बि. टी.चा अंतर्भाव करण्याची सक्‍ती कंपन्यांना केली नाही. पाच हजार कोटीची बि. टी. बियाणे कंपन्यांची उलाढाल आहे, असे शेतीप्रश्नाचे अभ्यासक विजय जावंधिया यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT