The beginning of the prevention campaign of lalya khurukut
The beginning of the prevention campaign of lalya khurukut  
मुख्य बातम्या

धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक मोहिमेस सुरूवात

टीम अॅग्रोवन

धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत पशुधनावरील लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पशुपालकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.  

लाळ्या खुरकूत रोग हा पशुधनातील विषाणूजन्य रोग आहे. या रोगास लाळ्या, तोंडखुरी, पायखुरी असेही म्हणतात. हा रोग पायात व्दिखुरी असलेल्या जनावरांध्ये आढळतो. या रोगाचा प्रसार हवेतूनही बाधित जनावरांमुळे होतो. जनावरांची पाणी प्यावयाची जागा, गव्हाणी व गुरांचे बाजार, आठवडे बाजार, जत्रा, पशुप्रदर्शन येथेही या रोगांचा फैलाव होऊ शकतो, असे पशुसंवर्धन विभागाने म्हटले आहे. 

लाळखुरकत या रोगामुळे जनावरांमधील मृत्युदर कमी आहे. पण, रोगाचा प्रादुर्भाव तीव्र स्वरुपाचा असल्याने गायी, म्हशींचे दूध कमी होण्याचे प्रकार वाढत आहेत. शेतीकाम, ओढकामासाठी वापरण्यात येणाऱ्या बैलांमध्ये अशक्तपणा येण्याची समस्या आहे.

यासंदर्भात ही मोहिम सुरू आहे. केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तसेच राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यातील ४ ते ६ महिने वयावरील गोवर्गीय व म्हैसवर्गीय पशुधनाचे १०० टक्के लसीकरण करण्यात येणार आहे. 

या कार्यक्रमांतर्गत पशुधनास सहा महिन्यांच्या अंतराने वर्षातून दोन वेळा लसीकरण करावयाचे आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

SCROLL FOR NEXT