banana
banana  
मुख्य बातम्या

खानदेशात केळीची कमी दरात खरेदी 

टीम अॅग्रोवन

जळगाव ः खानदेशात नवती केळी बागांची काढणी सुरू झाली आहे. परंतु प्रचलित दरांच्या तुलनेत १०० ते २०० रुपये कमी दरात केळी खरेदीचा प्रकार चोपडा, यावल भागात सुरू आहे. कोरोना व लॉकडाउन अशा समस्या सांगून खरेदीदारांनी दर पाडल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.  सध्या केळीची अधिक आवक यावल, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर भागात सुरू आहे. परंतु कमी दर्जाच्या केळीचे कारण सांगून केळीची खरेदी प्रचलित दरांपेक्षा १०० ते २०० रुपये कमी दरात केली जात आहे. कमी दरात खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. खरेदीदार शेतकऱ्यांना केळीच्या काढणीचे आश्‍वासन देत आहेत. परंतु चार ते पाच दिवस उशीर काढणीला करतात. तोपर्यंत काढणीयोग्य केळी झाडांची उष्णता, वाऱ्याने पडझड होते. आणखी नुकसान होईल, या भीतीने शेतकरी कमी दरात काढणीला तयार होतात. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.  केळीचे दर रावेर येथील बाजार समिती रोज जाहीर करीत आहे. परंतु जे दर होतात, त्यात खरेदी केली जाते की नाही, हा मुद्दा आहे. केळीची ९६ ते ९७ टक्के खरेदी थेट शेतात किंवा शिवार खरेदी केली जाते. या खरेदीवर बाजार समिती, प्रशासन किंवा जिल्हा उपनिबंधक, सहायक निबंधक कार्यालयाचे नियंत्रण कुठेही नाही. हे नियंत्रण नसल्याने खरेदीदार मनमानी करीत आहेत.  केळी नाशवंत असल्याने शेतकऱ्यांची कोंडी करून कमी दरात खरेदीचा प्रकार सर्रास सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. केळी खरेदीदारांची नोंदणी, परवाने याचीदेखील तपासणी कुठे केली जात नाही. फक्त दर जाहीर करण्याचे काम बाजार समित्या करतात, अशी नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यात अनेकदा खरेदीदार केळी काढणीनंतर शेतकऱ्यांची फसवणूकही करीत आहेत, असेही सांगण्यात आले.  शेतकऱ्यांना आर्थिक फटका  सध्या केळीचे दर ११०० ते १३५० रुपये, एवढे जाहीर होत आहेत. परंतु चोपड्यातील तापी काठानजीकच्या भागात केळीची काढणी ८०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल या दरात केली जात आहे. जळगाव तालुक्यातही काही शेतकऱ्यांची नवती केळी काढणीवर आहे, या भागातही कमी दरात केळीची खरेदी करण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे जे दर जाहीर होत आहेत, त्यातच खरेदीची सक्ती व्यापारी, खरेदीदारांना करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT