लसीकरणानंतरही नियम पाळावे लागणार : पंतप्रधान मोदी
लसीकरणानंतरही नियम पाळावे लागणार : पंतप्रधान मोदी 
मुख्य बातम्या

लसीकरणानंतरही नियम पाळावे लागणार : पंतप्रधान मोदी

सकाळ न्यूज नेटवर्क

अहमदाबाद : देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने घट होत असली तरीसुद्धा लोकांनी खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. प्रत्यक्ष लसीकरणानंतर देखील आपल्याला कोरोना नियमांचे पालन करावे लागेल असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी (ता.31) देशवासीयांना ‘दवाई भी, कडाई भी’ असा सूचक संदेश दिला.  राजकोटमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा पायाभरणी कार्यक्रम मोदींच्या उपस्थितीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडला. यावेळी बोलताना मोदींनी भारत जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम राबविण्यास तयार असल्याचे सांगितले. आतापर्यंत ‘मी जब तक दवाई नहीं तब तक ढिलाई नही असे म्हणत होतो. आता नव्या वर्षासाठी ‘दवाई भी, कडाई भी’ या मंत्राचा स्वीकार करावा लागणार असल्याचे ते म्हणाले. कोरोना लसीकरणाबाबत अनेक अफवा देखील पसरू शकतात, लोकांनी त्यावर विश्‍वास ठेवू नये. काही मंडळींनी आतापासून खोटी माहिती पसरविण्यास सुरवात केली आहे. प्रत्येक व्यक्तीपर्यंत लस पोचविण्याची तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे. देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येमध्येही घट होते आहे. २०२० मध्ये वाढत्या संसर्गामुळे निराशेचे वातावरण होते आता नवे वर्ष उपचाराच्या आघाडीवर नवी आशा घेऊन येते आहे असेही त्यांनी नमूद केले. 

मोदी म्हणाले 

  • देशातील लसीकरणाची तयारी वेगात 
  • स्वदेशी बनावटीची लस सर्वांना मिळेल 
  • वेळेवर पावले उचलल्याने संसर्ग नियंत्रणात 
  • आयुष्मान भारतमुळे गरिबांचे ३० हजार कोटी वाचले 
  • जनऔषधी केंद्रांतून माफक दरात औषधांचा पुरवठा 
  • सहा वर्षांत दहा नव्या एम्सच्या उभारणीवर काम 
  • आता २०२१ हे आरोग्य उपाययोजनांचे वर्ष ठरेल 
  • वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा सुधारणार  कोरोना संसर्गाच्या काळात समाजाची सेवा करताना बलिदान करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना मोदींनी श्रद्धांजली अर्पण केली. देशातील वैद्यकीय शिक्षणात सुधारणा घडवून आणण्यासाठी आपण युद्धपातळीवर प्रयत्न करतो आहोत. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या स्थापनेनंतर या शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा होईल, असा विश्‍वासही मोदी यांनी व्यक्त केला. 

    नवे रुग्णालय  गुजरातच्या आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांना बळकटी देणाऱ्या ७५० खाटांच्या एम्स रुग्णालयाच्या इमारतीचा विस्तार २०१ एकरमध्ये असेल. यावर ११९५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून २०२२ पर्यंत हे रुग्णालय बांधून पूर्ण होईल. या रुग्णालयातील ३० खाटा आयुष उपचारपद्धतीसाठी राखीव असतील तर आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी तसेच रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाइकांसाठीही येथे राहण्याची सोय असेल. 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

    Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

    Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

    Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

    Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

    SCROLL FOR NEXT