बाजार समित्यांमधील लिलावाला पावसाचा फटका
बाजार समित्यांमधील लिलावाला पावसाचा फटका 
मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील लिलावाला पावसाचा फटका

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः पावसामुळे जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा आदी बाजार समित्यांमध्ये धान्याच्या लिलावाबाबत सोमवारी (ता. २१) व मंगळवारी (ता. २२) अडचणी आल्या. मंगळवारी तर बाजार समित्यांमध्ये धान्याची अपवाद वगळता आवकच झाली नाही. व्यापारी ते व्यापारी, असे व्यवहार झाले.  जळगाव बाजार समितीत यंदा सोयाबीनची आवक हवी तशी सुरू झालेली नाही. मळणी अजून सुरूच आहे. अशातच पाऊस आल्याने मळणी लांबणीवर पडली असून, सोयाबीनचा दर्जाही खालावला आहे. ज्यांनी मळणी पूर्ण करून घेतली. त्या शेतकऱ्यांनी अद्याप विक्री केलेली नाही. कारण, बाजारात सोयाबीनला हमीभावाएवढे दर नाहीत. किमान ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. यामुळे साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांनी बाजारात सोयाबीन आणणे टाळले आहे. तर ज्यांनी सोयाबीनची वाळवणूक, प्रतवारी करून घेतली, त्या शेतकऱ्यांचा सोयाबीन पावसामुळे बाजारात येऊ शकलेला नाही. अमळनेर, चोपडा येथे लिलावासाठी स्वतंत्र जागा आहे. परंतु, पावसात शेतीमाल ओला होण्याची, अधिक आर्द्रता वाढण्याची भीती असते. यामुळे अडतदारही लिलावात फारसे सहभागी होत नसल्याची माहिती मिळाली. जळगाव बाजार समितीत धान्य लिलावानंतर त्याच्या साठवणुकीसाठी शेतकऱ्यांसाठी शेड नाही. यामुळे सोयाबीनची आवक रोडावली आहे. चोपडा येथील बाजारात मागील दोन दिवसांत दोन हजार क्विंटलदेखील सोयाबीनची आवक झालेली नसल्याची माहिती मिळाली. अशीच स्थिती अमळनेरात आहे. तर जळगाव बाजार समितीतही फारशी आवक नसल्याची माहिती मिळाली. 

सणासुदीमुळे अडचण येत्या २५ तारखेपासून म्हणजेच शुक्रवारपासून दिवाळीच्या सणाला प्रारंभ होत आहे. सणासुदीमुळे धान्य मार्केट यार्ड बंदची स्थिती राहील. यामुळे या व पुढील आठवड्यातही बाजारात लिलाव फारसे होणार नाहीत, असे सांगितले जात आहे. यातच पावसाचा व्यत्यय आल्याने लिलावासंबंधी बाजारांमध्ये अडचणी वाढल्या आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT