american fall army worm
american fall army worm  
मुख्य बातम्या

खानदेशात मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा शिरकाव 

टीम अॅग्रोवन

जळगाव : खानदेशात मका पिकाची लागवड यंदा बऱ्यापैकी आहे. पण २५ ते ४० दिवसांच्या पिकात अमेरिकन लष्करी अळीचा शिरकाव झाला आहे. 

धुळ्यातील शिरपूर, धुळे, नंदुरबारमधील शहादा, जळगावमधील रावेर, यावल, जळगाव, चोपडा आदी भागांत मका पीक आहे. कापूस, मुगाऐवजी अनेकांनी मक्याची लागवड केली. मक्याचे दर एप्रिल ते जूनदरम्यान स्थिर होते. यामुळे मक्याकडे शेतकरी वळले. पण या हंगामातही पिकात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. शिरपुरात अधिक प्रादुर्भाव आहे. जळगावमधील एरंडोल, पाचोरा, चोपडा, जळगाव भागातही लष्करी अळीबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत. कृषी विभाग कामगंध सापळे व शिफारशीत कीटकनाशकांच्या योग्य मात्रांनुसार फवारणीचे आवाहन करीत आहे. शेतकऱ्यांना कामगंध सापळ्यांची खरेदी बाजारातून करावी लागत आहे. 

तापी, गिरणा, अनेर आदी नद्यांच्या क्षेत्रात मका पीक अधिक आहे. या भागात मध्यंतरी पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांनी सिंचन करून पीक वाचविले. पण पिकात २५ ते ४० दिवसांत अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला. काही भागात हा प्रादुर्भाव अधिक आहे. नुकसान २५ ते ३० टक्के आहे. तर काही भागांत नुकसान २० टक्के आहे. अळीचा अटकाव करण्यासाठी शेतकरी फवारण्या घेत आहेत. कामगंध सापळे एकरी सहा यानुसार लावत आहेत. यात कीडनाशके, सापळ्यांवर एकरी किमान तीन हजार रुपये खर्च शेतकऱ्यांना या अळीमुळे अधिकचा करावा लागत आहे. कीडनाशके, सापळे मोफत किंवा ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना मंडळ स्तरावर वितरित करावेत, अशी मागणी केली जात आहे. कारण हा खर्च पुढेही करावाच लागेल. 

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला  सापळ्यांमधील ल्यूर बदलावे लागतात. एक ल्यूर ७० ते १०० रुपयांत मिळतो. तसेच तीनदा कीडनाशके फवारणी करावी लागेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. लष्करी अळीचा प्रादुर्भाव सुमारे १० हजार हेक्टर क्षेत्रात सध्या दिसत आहे. १२ जुलैनंतर लागवड केलेल्या पिकात हा प्रकोप आढळलेला नसल्याचे सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT