मुख्य बातम्या

गूळ उत्पादन तीस टक्क्‍यांपर्यंत घटण्याचा अंदाज

Raj Chougule

कोल्हापूर : पाऊस व रोगामुळे ऊस उत्पादनावर परिणाम होणार असल्याने त्याचा फटका यंदाच्या गूळ उत्पादनालाही बसण्याची शक्यता आहे. ऊस उत्पादन घटीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुळाचे उत्पादन तीस टक्क्‍यांपर्यंत घटण्याचा अंदाज गूळ उद्योगातून व्यक्त केला जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, कागल, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी तालुक्‍याचा काही भाग हा गुळाचे आगर समजला जातो. गुळासाठी उपयुक्त जातीचा ऊस या भागात घेतला जातो. या तालुक्‍यांमध्ये इतर भागापेक्षा पाऊसही जास्त होतो.

यंदा मात्र पाच ते सात दिवसांचा कालावधी वगळता पावसाळ्याचे संपूर्ण दिवस कोरडे गेले आहेत. यामुळे उसाची वाढ झाली नाही. प्रतिकूल हवामानामुळे उसाच्या उताऱ्यात घट होण्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम गूळ निर्मिती करताना होईल.

गुळाच्या अनेक व्हरायटीही वाढ थांबल्याने लवकरच परिपक्व झाल्या आहेत. याचा प्रतिकूल परिणाम गूळ उताऱ्यावर होणार असल्याचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

गूळदरात वाढ शक्‍य    गेल्या वर्षीही गुळाचे दर तेजीत होते. गुळाला सातत्याने तीन हजार रुपये क्विंटलच्या वर दर मिळाला. यंदाही हीच परिस्थिती कायम राहील असा अंदाज आहे. गुळाचा दर हा साखर कारखान्यांच्या दरावरही अवलंबून असतो. यंदा एफआरपीत वाढ झाल्याने यंदाही उसाचा दर गेल्या वर्षीपेक्षा जास्त मिळण्याचा अंदाज आहे.

यंदा उसाची वाढ झाली नाही. यामुळे गेल्या वर्षीइतकेही गूळ उत्पादन निघेल याची शाश्‍वती वाटत नाही. यंदा घट निश्‍चित आहे.

- मनोज पाटील, गूळ उत्पादक, पाडळी, जि. कोल्हापूर आम्ही गळू संशोधन केंद्रावर नुकत्याच गुळासाठी लागवड केलेल्या काही जातींची वाढ तपासली आहे. अनेक जातींच्या उसाची वाढ अनपेक्षितरीत्या थांबून त्या आताच परिपक्व झाल्या आहेत. आणखी कालावधीनंतर हा ऊस खराब होण्याची शक्यता असल्याने गुळाच्या उत्पादनात उसाच्या वाढीअभावी घट होण्याची शक्‍यता आहे.

- डॉ. अशोक पिसाळ, कृषी विद्यावेत्ता, प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT