मांडवा खुर्द, जि. नगर ः शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. (छायाचित्र ः सनी सोनावळे)
मांडवा खुर्द, जि. नगर ः शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. (छायाचित्र ः सनी सोनावळे) 
मुख्य बातम्या

दूधदर घसरणीच्या निषेधार्थ आंदोलन

टीम अॅग्रोवन

नगर  ः मागणी करूनही सरकार जाणीवपूर्वक दुधाला दर देत नसल्याचा आरोप करत शुक्रवारी (ता. ४) मांडवे खुर्द (ता. पारनेर) येथे शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून मोफत दूध वाटप करत सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदविला. सरकारने दूध दराबाबत गंभीर दखल घेतली नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आले. श्रीरामपूर, अकोले भागातही शेतकऱ्यांनी शुक्रवारी आंदोलन केले. 

घोषणा करूनही सरकार दुधाला दर देत नसल्याने दोन दिवसापासून ‘लुटता कशाला फुकट घ्या’ असे सांगत शेतकरी सरकारच्या धोरणांचा निषेध करत आहेत. पारनेर तालुक्‍यातील मांडवे खुर्द येथे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मोफत दूध वाटप केले. ‘सरकार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना मारत आहे. सरकार आणि विरोधी पक्षनेतेही शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. 

यावेळी भूमिपुत्र संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष वाडेकर, राज्य प्रवक्ते अनिल देठे, ज्ञानेश्‍वर गागरे, बाजीराव गागरे, यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT