पुणे कृषी महाविद्यालयात आजपासून कृषी तंत्रज्ञान महोत्सव
पुणे कृषी महाविद्यालयात आजपासून कृषी तंत्रज्ञान महोत्सव 
मुख्य बातम्या

पुणे कृषी महाविद्यालयात आजपासून कृषी तंत्रज्ञान महोत्सव

टीम अॅग्रोवन

पुणे : बदलत्या हवामानात शेतकऱ्यांनी आर्थिक उत्पन्न कसे वाढवावे या उद्देशाने पुणे कृषी महाविद्यालयाच्या वतीने रविवार (ता. १०) कृषी तंत्रज्ञान महोत्सव घेण्यात येत आहे. महोत्सव रविवार ते बुधवार (ता. १३) या कालावधीत सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.   महोत्सवाचे उद्घाटन रविवारी दुपारी दोन वाजता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री पाडुरंग फुडकर, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार उपस्थित राहणार आहेत.  या महोत्सवादरम्यान राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विविधांगी कृषीविषयक संशोधने एकाच ठिकाणी पाहण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. महोत्सवात महाविद्यालयाच्या ११० एकर क्षेत्रावर तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया तसेच नगदी पिके यामधील विविध २८ पिकांचे ७४ वाण, वीस भाजीपाला पिकांचे ३९ वाण, बारा फुलपिकांचे ४६ वाण, फळपिकांचे २४ वाणांची पीक प्रात्यक्षिके पाहण्यास मिळणार आहे. याशिवाय भारतीय गोवंशाच्या नऊ जाती शेतकऱ्यांना पाहता येणार आहे. कार्यक्रमाला विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT