Agriculture department cracks down on fertilizer sellers in Solapur district
Agriculture department cracks down on fertilizer sellers in Solapur district 
मुख्य बातम्या

सोलापूर जिल्ह्यात कृषी विभागाकडून खत विक्रेत्यांवर धडक कारवाई

टीम अॅग्रोवन

सोलापूर  ः गेल्याच आठवड्यात जिल्ह्यातील २१ खत विक्रेत्यांनी पॉस मशिन वापराकडे दुर्लक्ष केले. या कारणावरुन त्यांच्या परवाने निलंबनाची कारवाई जिल्हा अधीक्षक कृषि अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. त्यानंतर कृषि विभाग आणखी सतर्क झाला आहे. खताची मागणी आणि उपलब्धता पुरेशी असतानाही काही विक्रेते जाणीवपूर्वक खताची लिकिंग वा पॉस मशिनच्या वापराकडे दुर्लक्ष करत असल्यास थेट संपर्क करा, कारवाई केली जाईल, असे कृषि विभागाकडून सांगण्यात आले. 

जिल्ह्यात युरियासह रासायनिक खत विक्रेत्यांकडून कशापद्धतीने खते वाटप होतात, यावर ‘ॲग्रोवन’ने यापूर्वी सातत्याने वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यानंतर बुधवारच्या (ता.२६) अंकातही पुन्हा ‘ॲग्रोवन’मध्ये याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले. शासनाकडून अनुदानित खतांची विक्री करीत असताना शेतकऱ्यांना पॉस मशिनवर अंगठ्याचा ठसा नोंदवून खते द्यावीत, असे आदेश आहेत. 

मध्यंतरी काही दिवस कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अंगठा नोंदवण्याऐवजी आधार क्रमांक पॉस मशिनवर नोंदवून खते देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. परंतु, आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहिसा कमी झाल्याने कृषि विभागाकडून पुन्हा एकदा पॉस मशिनची सक्ती करण्यात येत आहे. परंतु, अनेक खत विक्रेते त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. काही विक्रेते मुद्दामाहून खताची लिकिंग करणे, युरियाचा कृत्रिम तुटवडा भासवणे, पॉस मशिनचा वापर टाळणे, असे प्रकार करत आहेत. 

काही कृषी सेवा केंद्रचालकांनी  शेतकऱ्यांना खते देताना त्यांच्या आधार क्रमांकाऐवजी इतरांच्या नावाने पॉस मशिनवर नोंदणी केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कृषि विभागाने अधिक सतर्क होऊन थेट कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रवींद्र माने यांनी अशा कृषि सेवा केंद्रांवर कारवाईचे आदेश दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT