संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

ठोस तोडग्याअभावी ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन सुरूच

टीम अॅग्रोवन

अकोला  ः राज्यात २२ ऑगस्टपासून ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन सुरू असून, अद्यापही ठोस तोडगा निघालेला नाही. गेल्या १४ दिवसांपासून आंदोलन सुरू असल्याने ग्रामपंचायतींचे कामकाज पूर्णतः ठप्प झाले आहे. दरम्यानच्या काळात मुंबईत बैठका झाल्या, मात्र आश्‍वासन नको आदेश काढा, या मागणीवर ग्रामसेवक संघटना ठाम राहिल्याने आंदोलनाचा कालावधी वाढत चालला आहे.

राज्यात कार्यरत असलेल्या २२ हजार ग्रामसेवकांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. त्यात प्रामुख्याने गावपातळीवर समकक्ष काम करणाऱ्या राज्य शासन, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ग्रामसेवकांना अधिक काम असतानाही इतरांच्या तुलनेत वेतनात असमानता आहे. पदोन्नतीची संधी मिळत नाही. सोबतच इतर फायदेसुद्धा मिळत नाहीत. इतर विभागांच्या अनेक कामांसाठी ग्रामसेवकांवर सक्ती केली जाते. ग्रामसेवक तणावग्रस्त होऊन त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत, अशा विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसेवक संघटनेने ९ ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडले. त्यानंतर २२ ऑगस्टपासून राज्यात सर्वत्र कामबंद आंदोलन सुरू केले. ग्रामपंचायतींच्या रेकाॅर्डच्या चाव्या गटविकास अधिकाऱ्यांकडे जमा केल्या आहेत.

ग्रामसेवकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी आजपर्यंत मंत्र्यांसह सचिवस्तरावर बैठका झाल्या. मागण्या सोडविण्याचे आश्‍वासन देण्यात आले. मात्र ग्रामसेवकांची संघटना यापूर्वीचा अनुभव पाहता आदेश काढण्याच्या मागणीवर ठाम राहिलेली आहे. परिणामी, आंदोलनाबाबत आजवर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. या आंदोलनाचा ग्रामपंचायतींच्या कामांवर परिणाम झाला आहे. आंदोलनाची झळ नागरिकांना बसत असून, विविध प्रकारचे दाखले मिळेनासे झाले आहेत.    या आहेत प्रमुख मागण्या

  • समान काम-समान दाम.
  • समकक्ष पदे-समान वेतनश्रेणी.
  • ग्रामसेवकांच्या शैक्षणिक अर्हतेत बदल करावा. लोकसंख्या आधारित ग्रामविकास अधिकारी पदात वाढ करावी.
  • वेतनत्रुटी दूर करणे. 
  • २००५ नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. 
  • आदर्श ग्रामसेवकांना आगाऊ एक वेतनवाढ द्यावी. 
  • ग्रामसेवक युनियनचे महाअधिवेशन घ्यावे.
  • अतिरिक्त कामे कमी करावीत.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

    Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

    Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

    Indian Farmer : बळीराजा जागा हो...

    Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

    SCROLL FOR NEXT