पीकविमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी
पीकविमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी 
मुख्य बातम्या

संग्रामपूर तालुक्यात ‘आपले सरकार’ ठरत आहे डोकेदुखी

टीम अॅग्रोवन

संग्रामपूर, जि. बुलडाणा  ः तालुक्यात ग्रामपंचायतस्तरावर असलेले आपले सरकार सेवा केंद्र सध्या शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी बनले आहे.

या केंद्रामधून पीकविमा भरला जात नसल्याने खासगी केंद्रावर शेतकऱ्यांची अलोट गर्दी होत आहे. शेतकऱ्यांकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दर घेतले जात असल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामपंचायतस्तरावर नेमलेल्या ऑपरेटर्सचे मागील १६ महिन्यांपासून पगार थकलेले असल्याने त्यांनी आता कामे करणे बंद केले आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. याकडे शासन आणि प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पीकविमा भरण्याची मुदत पाहता शेतकऱ्यांना कामे सोडून दिवसभर खासगी केंद्रावर बसावे लागत आहे. संपूर्ण जिल्हाभरात हीच स्थिती असताना ही कुणीच बोलताना दिसत नाही. वास्तविक पाहता प्रत्येक ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषदेने १४व्या वित्त आयोगाच्या निधीतून ऑपरेटरच्या वेतनापोटी पैसे घेतलेले आहेत. असे असताना १६ महिन्यांपासून ऑपरेटर्सचे पगार कसे झाले नाहीत, हाही चर्चेचा विषय ठरत आहे. वेतन झाले नसल्याने या तालुक्यात गाव पातळीवर एकही दाखला ऑनलाइन मिळत नाही अशी स्थिती आहे. प्रत्येक दाखल्यासाठी नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणीच यावे लागते. दुसरीकडे या तालुक्यात  इंटरनेट सुविधा अत्यंत संथगतीने चालत असल्याने सर्वांसाठी ही एक वेगळी डोकेदुखी बनलेली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tomato Rate : टोमॅटोचे दर उतरलेलेच, मेथीच्या दरात वाढ, पावसाचा भाजीपाला मार्केटवर असा परिणाम

Onion Export : कांदा निर्यात परवानगीवरून राजकारण तापले! शरद पवारांसह राऊत यांची मोदींवर घणाघाती टीका

Soil Nutrient Management : जमिनीमध्ये संतुलित अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन

Rabadi Production Industry : रबडी निर्मितीद्वारे मिळवला दरांचा योग्य मोबदला

Hapoos Mango Prices : हापूस आंब्याच्या दरात घसरण, वादळी पावसाचा परिणाम

SCROLL FOR NEXT