राज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली; उतारा कमी
राज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली; उतारा कमी 
मुख्य बातम्या

राज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली; उतारा कमी

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१ साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. पहिल्या टप्प्यात ८.८५ टक्के इतका कमी उतारा मिळत आहे. गेल्या हंगामात १०१ सहकारी व ८७ खासगी कारखान्यांना ९.०५ लाख हेक्टरवरील ९५२ लाख टन उसाचे गाळप केले. त्यापासून १०७ लाख टन साखर तयार झाली होती. यंदा आतापर्यंत ५१ सहकारी व ४२ खासगी कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे.  ‘‘हंगामात धुराडी पेटवण्यात आघाडी घेतलेल्या कारखान्यांनी ५७.३९ लाख टन उसाची खरेदी शेतकऱ्यांकडून केली आहे. त्याचे गाळप करून ५०.८० लाख क्विंटल साखर तयार केली आहे. पहिल्या टप्प्यात अपेक्षेप्रमाणे उतारा कमीच आहे,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले.  गेल्या हंगामात राज्यातील कारखान्यांचा एकूण साखर उतारा ११.२४ टक्के इतका नोंदविला गेला होता. उतारा जादा असल्यास साखर उत्पादन वाढते. सर्वात कमी उतारा २०१४-१५ च्या हंगामात ११.३ टक्के इतका मिळाला होता. गाळपासाठी यंदा आतापर्यंत १३३ कारखान्यांना परवाने देण्यात आलेले आहेत. अजून १९ कारखान्यांना परवाने देता येतील. मात्र, कायदेशीर अडचणींमुळे परवाने वाटलेले नाहीत.  ‘‘राज्यातील काही कारखान्यांनी थकविलेली एफआरपी व्याजसह मिळण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झालेली आहे. राज्य शासनाने आपल्या प्रतिज्ञापत्रात अशा २९ कारखान्यांना गाळप परवाना दिला जाणार नाही, असे न्यायालयाला सांगितले आहे. त्यामुळे या कारखान्यांना परवाना दिला गेलेला नाही,’’ असे सूत्रांचे म्हणणे आहे.  एफआरपी थकविलेल्या १६ कारखान्यांनी शेतकऱ्यांना पेमेंट अदा केलेले आहे. मात्र, त्यात व्याज अदा केलेले नाही. त्यामुळे या पेमेंटला कायदेशीर म्हणावे किंवा कसे याबाबत शासनाकडून चाचपणी केली जात आहे. उच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीत यातील संभ्रम दूर होण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tomato Rate : टोमॅटोचे दर उतरलेलेच, मेथीच्या दरात वाढ, पावसाचा भाजीपाला मार्केटवर असा परिणाम

Onion Export : कांदा निर्यात परवानगीवरून राजकारण तापले! शरद पवारांसह राऊत यांची मोदींवर घणाघाती टीका

Soil Nutrient Management : जमिनीमध्ये संतुलित अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन

Rabadi Production Industry : रबडी निर्मितीद्वारे मिळवला दरांचा योग्य मोबदला

Hapoos Mango Prices : हापूस आंब्याच्या दरात घसरण, वादळी पावसाचा परिणाम

SCROLL FOR NEXT