60% sowing of sorghum in Pune division
60% sowing of sorghum in Pune division 
मुख्य बातम्या

पुणे विभागात ज्वारीची ६० टक्के पेरणी

टीम अॅग्रोवन

पुणे ः परतीच्या पावसामुळे ज्वारीच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. वाफसा उशिराने आल्यामुळे पेरण्या बऱ्यापैकी झाल्या आहे. मात्र, रब्बी ज्वारीच्या पेरण्या अपेक्षित क्षेत्रावर झाल्या नाही.

पुणे विभागात आत्तापर्यंत नऊ लाख ७३ हजार १६२ हेक्टरपैकी पाच लाख ८ हजार ११ हेक्टर म्हणजेच ६० टक्के पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. यंदा चांगल्या झालेल्या पावसामुळे ज्वारी पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाचा होता. ज्वारीच्या पेरणीस ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा कालावधी चांगल्या असतो. मात्र, उशिराने झालेल्या पावसामुळे पुरेसा वाफसा नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी उशिराने पेरण्या करण्यास सुरुवात केल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरणी केली. सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहे. पुणे जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग, नगर जिल्ह्याच्या पूर्व, उत्तरेकडील तालुके, सोलापूरातील सांगोला, अक्कलकोट, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर ही तालुके ज्वारीच्या पिकांसाठी ओळखली जात असून विभागात जामखेड तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे.

नगर जिल्ह्यात ही सर्वाधिक ज्वारीची पेरणी जामखेड तालुक्यात झाली आहे. सुमारे ५४ हजार १७२ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. त्या खालोखाल नगर, पारनेर, नगर, कर्जत, पाथर्डी या तालुक्यात पेरणी झाली आहे. संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी तालुक्यात सर्वात कमी पेरणी झाली आहे.

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे. सुमारे २० हजार ४८६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ शिरूर, पुरंदर, भोर या तालुक्यात पेरणी झाली आहे. तर पश्चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली, खेड या तालुक्यात सर्वात कमी पेरणी झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातही बार्शी तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे. सुमारे ४३ हजार ८५२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यानंतर मंगळवेढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, सांगोला, करमाळा या तालुक्यात पेरणी झाली आहे. तर पंढरपूर, माळशिरस या तालुक्यात सर्वात कमी पेरणी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

Indian Farmer : बळीराजा जागा हो...

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

SCROLL FOR NEXT