सांगली जिल्ह्यात ‘फलोत्पादन’चे ५५५ लाभार्थीं
सांगली जिल्ह्यात ‘फलोत्पादन’चे ५५५ लाभार्थीं 
मुख्य बातम्या

सांगली जिल्ह्यात ‘फलोत्पादन’चे ५५५ लाभार्थीं

टीम अॅग्रोवन

सांगली ः एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून सन २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात ४५२ लाभार्थींना लाभ देण्यात आला आहे. त्याच्यासाठी २.९६ कोटी रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षात सप्टेंबरअखेर १०३ लाभार्थींना ८० लाख रुपये अनुदान केले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे यांनी दिली.

राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियान ही योजना २००५-०६ पासून राबविण्यात येत आहे. २०१४-१५ पासून योजनेत बदल करून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान म्हणून राबवले जाते. यामध्ये नवीन बगीचा स्थापन करणे, अंतर्गत क्षेत्रविस्तार या बाबीखाली शेतकऱ्यांना आंबा, पेरू घनलागवडीकरिता ४० हजार रुपये प्रतिहेक्‍टर, फुले लागवडीमध्ये निशिगंधसाठी अल्पभूधारकांना ६० हजार रुपये प्रतिहेक्‍टर आणि इतर शेतकऱ्यांना ३७ हजार ५०० रुपये प्रतिहेक्‍टर अनुदान दिले जाते.

गुलाबासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना ४० हजार प्रतिहेक्‍टर आणि इतर शेतकऱ्यांना २५ हजार रुपये प्रतिहेक्‍टर आणि मसाला पिकांची लागवड करण्यासाठी १२ हजार रुपये प्रतिहेक्‍टर अनुदान मिळते. नवीन बगीचा लागवडीसाठी ३३४ लाभार्थिंनी लाभ घेतला. त्यासाठी २० लाख ४४ हजार लाख निधी दिला आहे.

नियंत्रित शेतीमध्ये हरतिगृह उभारण्यासाठी प्रतिचौरस मीटर ९३५ ते ८९० रुपयाच्या ५० टक्के अनुदान देण्यात येते. तर शेडिंगनेटसाठी प्रतिचौरस मीटर ४७६ ते ६०४ रुपयेच्या ५० टक्के अनुदान देण्यात येते. नियंत्रित शेतीसाठी जिल्ह्यात ४ लाभार्थींना ३० लाख रुपये निधी वाटप करण्यात आला आहे.

सन २०१८-१९ साठी ४९७ कोटी ४२ लाखांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये सप्टेंबरअखेर १०३ लाभार्थींना ८० लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे. त्यता नवीन बगीचासाठी १२ लाभार्थींना १ लाख ३४ हजार निधीचा समावेश आहे. नियंत्रित शेती घटकांतर्गत २ लाभार्थिंना ८ लाख ५९  हजार रुपये दिले. फलोत्पादनासाठी ३४ लाभार्थींना ३३ लाख ६६ हजार रुपये दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्ण लाटेचा इशारा

Soybean Rate : हिंगोली, परभणी बाजार समित्यांत सोयाबीन दर कमी

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

SCROLL FOR NEXT