48 percent useful water in 749 small projects in Marathwada
48 percent useful water in 749 small projects in Marathwada 
मुख्य बातम्या

मराठवाड्यातील ७४९ लघू प्रकल्पांत ४८ टक्‍केच उपयुक्‍त पाणी

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद  : मराठवाड्यातील ७४९ लघू प्रकल्पांत केवळ ४८.२५ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे. ४ मध्यम व ४४ लघू प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत. ११९ लघू प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखालीच असून, पाच मोठे प्रकल्प तुडुंब तर दोनमध्ये अजूनही उपयुक्‍त पाणीसाठाच झाला नसल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली. 

सप्टेंबरअखेरपर्यंत मराठवाड्यातील पाणीसाठ्याची स्थिती पाहता पुन्हा एकदा मराठवाड्याला भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागते की काय अशी स्थिती होती. परंतु ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, हा पाऊस मराठवाड्यातील प्रकल्पांसाठी संजीवनी देणारा ठरला आहे. 

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी मांजरा व सिनाकोळेगाव प्रकल्पात उपयुक्‍त पाणीसाठा नाही. तर जायकवाडी, येलदरी, माजलगाव, निम्न मनार, विष्णूपुरी हे पाच मोठे प्रकल्प तुडुंब आहेत. सिद्धेश्वर प्रकल्पात ९८ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा असून उर्ध्व पैनगंगा प्रकल्पात ७९ टक्‍के, निम्न तेरणा प्रकल्पात ३५ टक्‍के, निम्न दुधना प्रकल्पात १३ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे. 

मराठवाड्यातील ७४९ लघू प्रकल्पांमध्ये ४८.२५ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा आहे. त्यामध्ये जालना जिल्ह्यातील ५७ लघू प्रकल्पात केवळ २८ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे. त्यापाठोपाठ सर्वाधिक २०५ लघू प्रकल्प असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये  ३६ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ लघू प्रकल्पांत ४९ टक्‍के, बीड जिल्ह्यातील १२६ लघू प्रकल्पांत ४५ टक्‍के, लातूर जिल्ह्यातील १३२ लघू प्रकल्पांत ५२ टक्‍के, नांदेड जिल्ह्यातील ८८ प्रकल्पांत ८३ टक्‍के, परभणी जिल्ह्यातील २२ लघू प्रकल्पांत ५३ टक्‍के तर हिंगोली जिल्ह्यातील २६ लघू प्रकल्पांत ८८ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे. 

मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी १६ मध्यम प्रकल्पांत ४६ टक्‍के, जालनामधील ७ प्रकल्पांत ३६ टक्‍के, बीडमधील १६ प्रकल्पांत ५३ टक्‍के, लातूरमधील ८ प्रकल्पांत २९ टक्‍के, उस्मानाबादमधील १७ प्रकल्पांत ४६ टक्‍के, परभणीमधील २ प्रकल्पात ९२ टक्‍के पाणीसाठा झाला असून नांदेड जिल्ह्यातील सर्व ९ मध्यम प्रकल्प तुडुंब झाले आहेत. 

मध्यम प्रकल्पांपैकी औरंगाबाद जिल्ह्यातील १, बीडमधील ४, लघू प्रकल्पांपैकी औरंगाबाद, बीडमधील प्रत्येकी १६, उस्मानाबादमधील ५, लातूरमधील ६ तर जालनामधील एक प्रकल्प अजूनही कोरडाठाकच असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT