Sugar-Factory
Sugar-Factory 
मुख्य बातम्या

सॅनिटायझर्ससाठी ४५ साखर कारखाने, डिस्टिलरीजना परवानगी 

Raj Chougule

कोल्हापूर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. विषाणूच्या प्रतिबंधासाठी वापरण्यात येणाऱ्या सॅनिटायझरला प्रचंड मागणी वाढली आहे. या मागणीमुळे आता हँड सॅनिटायझर्स बनवण्यासाठी केंद्राने देशातील विविध राज्यातील ४५ साखर कारखाने, डिस्टिलरीजना परवाने देण्यात आल्याचे ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. पन्नासहुन अधिक कारखान्यांना येत्या दोन दिवसात परवाने देण्यात येतील असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

उत्पादकांना त्यांचे उत्पादन जास्तीत जास्त करण्यासाठी तीन शिफ्टमध्ये काम करण्यास सांगितले आहे. एका महिन्यात जे उत्पादन होते ते एका दिवसात तयार केले जाईल, असे केंद्रीय सूत्रांनी स्पष्ट केले. 

सर्वसामान्यांना आणि रुग्णालयांना रास्त दराने सॅनिटायझर उपलब्ध करुन देण्यात यावे यासाठी सरकारनेही किंमत मर्यादा घालून दिली होती; हँड सॅनिटायझरची जास्तीत जास्त किरकोळ किंमत २०० मिलीलीटरच्या बाटलीसाठी १०० रुपये निश्चित करण्यात आली होती. अनेक नामवंत खाजगी कंपन्यांनीही सॅनिटायझरच्या किमतीत कपात करत असल्याचे सांगितले होते.  यानंतर केंद्राने वेगात हालचाली करून कारखान्यांना सॅनिटायझर तयार करण्यासाठी उद्युक्त केले, त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कारखान्यांनी यात सहभाग घेतल्यास आरोग्य विभागाचा बराचसा ताण कमी होण्याची शक्यता असल्याचे मंत्रालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.  सांगलीतील या कारखान्याला परवानगी  सांगली येथील वसंतदादा कारखान्याला स्थानिक जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. तिथे अर्धा लिटर पासून पाच लिटरपर्यंत सॅनिटायझरचे उत्पादन होणार आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून कारखान्याने उत्पादन सुरू करण्याचे ठरवले आहे. सार्वजनिक ठिकाणी व शासकीय कार्यालयात ते मोफत वाटण्यात येणार आहे   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT