soybean
soybean  
मुख्य बातम्या

निकृष्ट बियाणेप्रकरणी ४० न्यायालयीन खटले

टीम अॅग्रोवन

वाशीम ः यंदाच्या हंगामात निकृष्ट बियाण्यामुळे शेतकरी कमालीचा फसला आहे. काहींना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. वाशीम जिल्ह्यात कृषी विभागाने वऱ्हाडात सर्वाधिक ४० कंपन्यांचे बियाणे अप्रमाणीत आल्या प्रकरणात न्यायालयात खटले दाखल केले आहेत. न्यायालयाच्या निकालानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईबाबत पुढील दिशा निश्‍चित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  वाशीम जिल्हा हा सोयाबीनचे आगार समजल्या जातो. या जिल्ह्यात तीन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली जाते. यंदाही एवढे क्षेत्र लागवडी खाली आलेले आहे. सोयाबीन उत्पादक बियाणे कंपन्यांसाठी हा जिल्हा फायदेशीर समजला जातो. मात्र यंदा बियाण्यात शेतकऱ्यांची फसगत झाली. शेतकऱ्यांनी विकत घेतलेले बियाणे उगवले नसल्याच्‍या शेकडो तक्रारी आल्या होत्या. काही तक्रारी या कंपन्यांनी वरचेवर सोडविल्या.  कृषी खात्याने या हंगामात विविध बियाण्याचे सुमारे १७७ नमुने काढले होते. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविल्यानंतर ५१ नमुने अप्रमाणीत आले. यापैकी ४२ प्रकरणे हे न्यायालयीन खटले दाखल करण्याच्या पात्रतेचे आहेत. तर नऊ प्रकरणे हे संबंधित कंपन्यांना ताकीद देण्याच्या पात्रतेचे निघाले. कृषी विभागाने पात्र असलेल्यापैकी ४० प्रकरणात जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात न्यायालयीन खटले दाखल केले आहेत. यात शासनाशी निगडीत तसेच खाजगी बियाणे उत्पादक कंपन्यांचा समावेश आहे. या प्रकरणात तालुका निरीक्षक किती सक्षमपणे बाजू मांडतात यावर बरेच काही अवलंबून आहे.

सोयाबीनसंदर्भातील खटले सर्वाधिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याबाबत सर्वाधिक तक्रारी आलेल्या आहेत. कृषी विभागाने सोयाबीनचे ६७ नमुने काढले होते. त्यापैकी ४३ नमुने हे अप्रमाणित आले. यापैकी ३४ नमुन्याबाबत न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले आहेत. नऊ कंपन्यांना ताकीद देण्यात आली आहे.

बियाणे नमुन्यांची स्थिती काढलेले बियाणे नमुनेः १७७  अप्रमाणीत नमुनेः ५१  सोयाबीन नमुनेः ६७  दाखल केलेले न्यायालयीन खटलेः ४०   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

SCROLL FOR NEXT