शिरोळमधील ३७ हजार कुटुंबांना स्थलांतरित होण्याच्या सूचना 37,000 families in Shirol Migration notices
शिरोळमधील ३७ हजार कुटुंबांना स्थलांतरित होण्याच्या सूचना 37,000 families in Shirol Migration notices 
मुख्य बातम्या

शिरोळमधील ३७ हजार कुटुंबांना स्थलांतरित होण्याच्या सूचना

टीम अॅग्रोवन

जयसिंगपूर, जि. कोल्हापूर : संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शिरोळ तालुक्यातील ४२ गावांतील ३७ हजार कुटुंबांना पुराच्या काळात सुरक्षितस्थळी स्थलांतर होण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. बाधित गावांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाच्या मॅरेथॅान बैठका सुरू आहेत. ग्राम दक्षता समित्याही सक्रिय झाल्या आहेत. गत महापुराचे अनुभव लक्षात घेऊन जीवित वा वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. बाधित गावांमध्ये पूर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. महापुराचा जिल्ह्यात सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसतो. या तालुक्यात कोट्यवधींचे नुकसान होते. इतर वेळी जीवनदायिनी वाटणाऱ्या नद्या पावसाळ्यात मात्र धडकी भरवणाऱ्या ठरतात. तालुक्यातील ४२ गावांना पुराचा फटका बसतो. नियोजन करताना २००५ व २०१९च्या महापुराचे अनुभव प्रशासनाच्या कामी येत आहेत. त्या दृष्टीने उपाययोजना राबविल्या जात आहेत. पावसाचा अंदाज लक्षात घेऊन तालुक्यातील ४२ गावांतील ३७ हजार कुटुंबांना आत्ताच इशारा देऊन सुरक्षित ठिकाणे शोधण्याची सूचना दिली  जात आहे. नागरिकांसह पशुधनाचीही विशेष दक्षता घेतली जात आहे. कोरोनाचे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. प्रशासनासह स्थानिक यंत्रणेची कसरत सुरू आहे. त्याचवेळी पुराचे संभाव्य संकट समोर दिसत आहे. गतवर्षी पुराचे संकट टळल्याने प्रशासनावरील ताण टळला होता. संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन प्रशासनासह ग्रामदक्षता समित्या दक्ष झाल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT