सोयाबीनचे दर सावरण्यासाठी पाशा पटेल यांचा पाठपुरावा
सोयाबीनचे दर सावरण्यासाठी पाशा पटेल यांचा पाठपुरावा 
मुख्य बातम्या

सोयाबीन दर उपाययोजनेसाठी मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर

टीम अॅग्रोवन

मुंबई : सध्या बाजारात सोयाबीनची आवक वाढल्याने बाजारभाव २००० ते २९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले आहेत. यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी गुरुवारी (ता. २६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. सोयाबीन, तूर, उडीद, मूग यांचे भाव वाढण्यासाठी करायच्या विविध उपाययोजनांची माहिती या वेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आली.  राज्यात सोयाबीनला बाजारामध्ये हमीभावपेक्षा कमी दर मिळत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सोयाबीन खाद्यतेलावर १७.५% आयात शुल्क असून, ते वाढवून २७% पर्यंत करावे. क्रूड पामतेलावर १५.५% व रिफाइन पामतेलावर २५.५% आयात शुल्क असून, दोन्ही प्रकारच्या तेलावर आणखीन २०% आयात शुल्कवृद्धी करावी. सूर्यफूल खाद्यतेलावर आयात शुल्क वृद्धी करावी. सध्या सोयाबीन आयात होत असून, त्यावर बंदी आणावी. सोयाबीन व कापूस पेंडीवर (डीओसी) ५% ऐवजी १०% निर्यात इन्सेन्टिव्ह देण्यात यावा. मसूर व मटार डाळीवर आयात शुल्क वाढवण्यात यावा. आयात होणाऱ्या तेलवर्गीय व डाळवर्गीय वस्तूंच्या आयातीचा आढावा घेण्यात यावा इत्यादी उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्र्यांना या वेळी देण्यात आली. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने या विषयावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांना मेल पाठवून दूरध्वनीवरून संपर्क साधला. तसेच याविषयी त्यांच्याशी चर्चा करून बाजारातील पडलेल्या सोयाबीनच्या दरात सुधारणा करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची विनंती केली. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तातडीने योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली आहे. या वेळी शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील नादिवाडीकर व अच्युत गंगणे हे उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT