संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

सोलापुरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढच

टीम अॅग्रोवन

सोलापूर  ः पंढरपूर, सांगोला, मोहोळ आणि आता अक्कलकोट अशा पद्धतीने कोरोनाचा प्रवास सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात होत असला, तरी तो नियंत्रणात आहे. पण सोलापूर शहरात वाढणारी संख्या सध्या चिंतेची बाब झाली आहे. फक्त एकट्या सोलापुरात कोरोनाबाधितांची संख्या ५९० पर्यंत पोचली आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर होत चालल्याचे चित्र आहे.

या आधी सांगोल्यात घेरडी, त्यानंतर पाचेगाव, त्यानंतर पंढरपुरातील उपरीत आणि आता अक्कलकोटमध्ये याठिकाणी प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. रुग्ण आढळून आल्यानंतर तातडीने या भागात उपाययोजना केल्याने सध्या या भागातील परिस्थिती नियंत्रणात आहे. पण सोलापुरातील परिस्थिती गंभीर वळणावर आहे. रोज आकडे वाढतच आहेत. गेल्याच आठवड्यात एकाचदिवशी ५० रुग्ण सापडले. तर त्यानंतरच्या सलग दोन दिवसांत प्रत्येकी सहा रुग्णांचा मृत्यू झाला होता.

आरोग्य, महसूल आणि पोलिस प्रशासन सर्वोतपरी काम करत आहे. पण नेमके कोठे चूक होते आहे, हे मात्र अद्याप लक्षात येऊ शकत नसल्याने रुग्णसंख्या वरचेवर वाढतच आहे. रोज शंभराहून अधिक संशयितांची तपासणी होते आहे. आतापर्यंत ५६४५ रुग्णांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५०५५ रुग्णांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर जवळपास ५९० रुग्ण कोरोनाबाधित सापडले आहेत. तर आतापर्यंतच्या मृतांची संख्या ५२ इतकी आहे. तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या २५४ इतकी आहे. कोरोना सध्या शहरातच अधिक पसरतो आहे. पण दोनच दिवसापूर्वी अक्कलकोटमध्ये एक रुग्ण आढळल्याने तो पुन्हा ग्रामीण भागाकडे वळतो की काय, अशी शंका निर्माण होते आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT