मागण्यांसाठी आंदोलन करताना विद्यार्थी
मागण्यांसाठी आंदोलन करताना विद्यार्थी 
मुख्य बातम्या

परभणी कृषी विद्यापीठ प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे उपोषण

टीम अॅग्रोवन

परभणी  : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ प्रशासन योग्य वागणूक देत नसल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी सोमवारी (ता.३) प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॅा. अशोक ढवण यांना यासंदर्भात विद्यार्थ्यांनी निवेदन दिले  आहे. 

या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘कृषी विद्यापीठ प्रशासनाकडून पदवी तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांना योग्यप्रकारे वागणूक दिली जात नाही. २०१६-१७ मध्ये सर्व शाखांचे शैक्षणिक शुल्क १४ हजार ६०० रुपये एवढे होते. त्यामध्ये वाढ करून २०१७-१८ मध्ये ते ३९ हजार ५०० रुपये म्हणजेच तिप्पट करण्यात आले. इतर राज्यातील विद्यापीठापेक्षा हे शुल्क अधिक आहे. कृषी अभ्यासक्रमास प्रवेश घेणारे विद्यार्थी हे शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील आहेत. सततच्या दुष्काळी स्थितीमुळे या विद्यार्थ्यांना एवढे शुल्क भरणे शक्य होत नाही. विद्यापीठाने आयसीएआर आणि एमसीएआर यांनी घालून दिलेल्या शैक्षणिक दंडकांचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करत असल्याचे उदाहरणे समोर आली आहेत. 

सत्रांत परीक्षांचा निकाल ४५ दिवसात लावण्याची जबाबदारी पार पाडली जात नाही. एकतर्फी निर्णय आणि वसतिगृह शुल्कात प्रचंड वाढ यामुळे विद्यार्थ्यांवर आर्थिक बोजा टाकण्यात आला आहे. अनेक विषयांना शिक्षक दिले जात नाहीत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या समस्यांची कोणतीही दखल प्रशासनाकडून घेतली जात नाही. कॅंम्पसमध्ये विद्यार्थ्यांना वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या अशा प्रकारच्या वागणुकीमुळे तीव्र असंतोष निर्माण झाल्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थिनींनी प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. 

विद्यापीठ स्तरावरील समस्या मार्गी लावण्याबाबत आश्‍वासन दरम्यान, कुलगुरू डॉ. अशोक ढवण, शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले, कुलसचिव रणजित पाटील यांनी विद्यापीठ स्तरावरील समस्या मार्गी लावण्याबाबत आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT