संजीव माने
संजीव माने  
मुख्य बातम्या

अॅग्रोवनमुळे माझे प्रयोग राज्यभरात विस्तारले : माने

टीम अॅग्रोवन

पुणे : अॅग्रोवनचा मी पहिल्या दिवसापासून वाचक आहे. यातील माहिती वाचून प्रयोगशील शेतीला शास्त्रज्ञ आणि विद्यापीठांमधील तंत्राची जोड दिली. ॲग्रोवनमुळे माझे प्रयोग राज्यभरात विस्तारले आणि त्यामुळेच माझ्यासारखा सामान्य शेतकरी अमेरिकेचे त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी ऊस शेतीच्या प्रयोगावर बोलू शकला, असे उद्गगार ऊस उत्पादक शेतकरी संजीव माने यांनी काढले. तसेच आता आम्हाला २०० टनांचे लक्ष्य गाठायचे असल्याचा संकल्पही व्यक्त केला. सकाळ माध्यम समूहाकडून दिला जाणारा मानाचा 'अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार' यंदा सांगलीच्या वाळवा भागातील आष्टा गावचे प्रयोगशील शेतकरी संजीव माने यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. राज्याच्या ऊस शेतीत शास्त्रज्ञांच्या तोडीचे क्रांतिकारक प्रयोग करणाऱ्या संजीव माने यांनी हजारो सामान्य शेतकऱ्यांपर्यंत ऊस उत्पादकता वाढीचे तंत्र पोचविले आहे. पुण्याच्या टिळक स्मारक सभागृहात त्यांना टाळ्यांच्या गजरात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. ‘उसाचे माझे पूर्वी एकरी उत्पादन २० टनांचे होते. विविध शास्त्रज्ञांच्या मदतीमुळे मी १२० टनांपर्यंत पोचलो आहे. अॅग्रोवनमधील तंत्र, शास्त्रज्ञांकडून मिळणारी माहिती यामुळे माझी प्रयोगशीलता सतत फलदायी ठरत गेली. आता आम्हाला २०० टनांचे लक्ष्य गाठायचे आहे असे माने यांनाी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tomato Rate : टोमॅटोचे दर उतरलेलेच, मेथीच्या दरात वाढ, पावसाचा भाजीपाला मार्केटवर असा परिणाम

Onion Export : कांदा निर्यात परवानगीवरून राजकारण तापले! शरद पवारांसह राऊत यांची मोदींवर घणाघाती टीका

Soil Nutrient Management : जमिनीमध्ये संतुलित अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन

Rabadi Production Industry : रबडी निर्मितीद्वारे मिळवला दरांचा योग्य मोबदला

Hapoos Mango Prices : हापूस आंब्याच्या दरात घसरण, वादळी पावसाचा परिणाम

SCROLL FOR NEXT