योशिनो यांना लिथीयम बॅटरीबद्दल जपानचा मानाचा पुरस्कार
योशिनो यांना लिथीयम बॅटरीबद्दल जपानचा मानाचा पुरस्कार  
मुख्य बातम्या

योशिनो यांना लिथीयम बॅटरीबद्दल जपानचा मानाचा पुरस्कार

वृत्तसेवा

मोबाईलसह विविध इलेक्ट्रॉनिक साधने चालण्यासाठी आवश्यक ऊर्जा पुरवणारी लिथीयम बॅटरीचे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या डॉ. अकिरा योशिनो यांना २०१८ या वर्षाचे जपानचा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या लिथीयम आयन बॅटरी विकासासोबतच ऊर्जास्रोत, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकीसंदर्भातील योगदानाचा गौरव करण्यात येत आहे. या पुरस्काराचे वितरण १८ एप्रिल रोजी टोकियो येथील भव्य कार्यक्रमात होईल. योशिनो यांनी ऋण इलेक्ट्रोड म्हणून कार्बन आणि धन इलेक्ट्रोड म्हणून लिथीयम कोबोल्ट ऑक्साईड यांचा वापर करीत बॅटरीची नवी संरचना तयार केली. धनप्रवाह स्वीकारण्यासाठी अॅल्युमिनियमचा उपयोग केला. या पद्धतीची अधिक कार्यक्षम बॅटरी तयार करणे आणि त्याचे यशस्वी व्यावसायिकरण करणे या कामांसाठी जपानच्या मानाच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. हा पुरस्कार जपान प्राईझ फाउंडेशनद्वारे १९८५ पासून दिला जातो. त्यात नावीन्यपूर्ण संशोधनाबरोबरच शांतता आणि मानवी जीवनमूल्यांच्या वृद्धीसाठी केलेल्या कामांचा विचार केला जातो. ही आहेत वैशिष्ट्ये आकाराने लहान, कमी वजनाची आणि रिचार्ज करता येणारी ही बॅटरी आहे. या बॅटरीच्या निर्मितीमुळे १९९० च्या दशकामध्ये डिजिटल युगाला अधिक वेगाने चालना मिळाली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT