गोठवणीनंतर पुन्हा जिवाणूंची वाढ सुरू झाली आहे. (स्रोत ः वारविक विद्यापीठ.)
गोठवणीनंतर पुन्हा जिवाणूंची वाढ सुरू झाली आहे. (स्रोत ः वारविक विद्यापीठ.)  
मुख्य बातम्या

जिवाणूंची अधिक काळ साठवण होईल शक्य

वृत्तसेवा

बर्फाखाली राहून थंड पाण्यातही तग धरणाऱ्या पोलर माशांमधील नैसर्गिक यंत्रणेचा अभ्यास करून वारविक विद्यापीठातील संशोधकांनी जिवाणू गोठवण्याचे नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. केवळ जिवाणूच नाही, तर मानवी अवयवही गोठवून अधिक काळापर्यंत साठविणे यातून शक्य होणार आहे. अन्न प्रक्रिया उद्योगासाठीही हे तंत्रज्ञान अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. वारविक विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. मॅथ्यू गिब्सन यांच्या गटाने जिवाणूंच्या विविध प्रजातींना गोठविण्याचे (फ्रिज किंवा क्रायोप्रिझर्व्ह) नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यामध्ये अत्यंत शीत वातावरणामध्येही गोठल्याविना राहणाऱ्या सजिवातील (अशा सजिवांना इंग्रजीत एक्स्ट्रिमोफिल्स असे म्हणतात.) प्रथिनांचा वापर केला आहे. या प्रथिनांची नक्कल केली असून, त्यातील दोन पॉलीमरचा वापर केल्यास बर्फाचे कण तयार होण्याचा वेग कमी होतो. परिणामी जिवाणूंच्या पेशी नष्ट होण्यापासून वाचतात.   

या पद्धतीचे फायदे

  • अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये अन्न अधिक काळ टिकविण्यासाठी उपयाेग होईल. अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये दही बनवणे, प्रोबायोटिकपूरक खाद्य तयार करणे अशा अनेक कारणांसाठी जिवाणूंचा वापर होत असतो. त्यासाठी जिवाणू टिकवणे अधिक उपयुक्त ठरेल.  आज पुनर्रोपणासाठी काढलेले मानवी अवयव त्वरीत बसवण्यामध्ये अडचणी येतात. असे अवयव अधिक काळ टिकवणे शक्य होतील.
  • सध्या प्रयोगशाळेत जिवाणू साठवण्यासाठी ग्लिसरॉलचा वापर केला जातो. मात्र, पुन्हा जिवाणूंचा वापर करण्यासाठी किंवा त्यांची योग्य वाढ होण्यासाठी ग्लिसरॉल काढण्याची गरज असते. भविष्यात वैद्यकीय प्रयोग आणि प्रयोगशाळेमध्ये औषधांच्या साठवणीसाठी हे तंत्रज्ञान उपयोगी पडणार आहे. (उदा. इन्सुलिन)
  • वॉशिंग पावडर निर्मितीसाठी (उदा. विकरे -एन्झायम्स).
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

    Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

    Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

    Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

    Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

    SCROLL FOR NEXT