बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी जाळ्यात
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी जाळ्यात 
मुख्य बातम्या

बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी जाळ्यात

वृत्तसेवा

लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक करून फरारी झालेला नीरव मोदी (वय ४८) याला स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी भारतीय अधिकाऱ्यांच्या वतीने बुधवारी (ता. २०) लंडनमध्ये अटक केली. बॅंकेला गंडा घालणाऱ्या मोदी याला अटक करण्यात येथील मेट्रो बॅंकेच्या कर्मचाऱ्याची हुशारी कामी आली, हा एक प्रकारचा योगायोगच आहे. नीरव मोदी मेट्रो बॅंकेत खाते उघडण्यासाठी गेला होता. त्या वेळी बॅंक कर्मचारी टेलर याने त्याला ओळखले व सावधानता बाळगत स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी कळविले. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी बॅंकेत पोचून त्याला ताब्यात घेतले. नीरव मोदी हा २५ मार्च रोजी पोलिसांना शरण येणार होता. त्याच्या वकिलांनी तसे जाहीर केले होते. पण त्यापूर्वीच तो पकडला गेल्याने वकिलांनाही धक्का बसला आहे. वेस्ट मिनिस्टर न्यायालयाने काल जामीन नाकारल्याने त्याला २९ मार्चपर्यंत कोठडीत राहावे लागणार आहे. आता नीरव मोदी याची सुनावणी मुख्य न्यायदंडाधिकारी एम्मा अब्रुथनॉट यांच्या समोर होणार आहे. फरारी उद्योगपती विजय मल्ल्या याचा खटल्याचेही कामकाज त्यांनीच पाहिले आहे. अटक होण्यापूर्वी नीरव मोदी वेस्टएंडमधील आलिशान घरात राहत होता. आता त्याची रवानगी इंग्लंडमधील सर्वांत दाटीवाटी असलेल्या "हर मॅजेस्टीज प्रीझन (एचएमपी) वॅंड्‌सवर्थ' या तुरुंगात करण्यात आली आहे. येथील माध्यमांच्या दाव्यानुसार या तुरुंगात अंडरवर्ल्ड डॉन दावूद इब्राहिम याचा पाकिस्तानमधील साथीदार जबीर मोती हाही कैदेत आहे. मोदी याच्या प्रत्यार्पण प्रकरणावरील सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे. तोपर्यंत त्याला तुरुंगात राहावे लागणार आहे. असे आहे 'एचएमपी वॅंड्‌सवर्थ'

  • 'ब'दर्जाचे कारागृह
  • उच्च दर्जाची सुरक्षा जोखीम नसलेल्या गुन्हेगारांची रवानगी
  • मार्च २०१८मधील अहवालानुसार तुरुंगातील पुरुष कैद्यांची संख्या एक हजार ४२८
  • इंग्लंड व वेल्समधील सर्वाधिक गर्दी असलेला तुरुंग
  • अमली पदार्थ व मानसिक आरोग्याशी संबंधित कैदी जास्त
  • एका रुग्णाच्या जागी दोन कैद्यांची भरती
  • पुरेशा प्रसाधनगृहांचा अभाव
  • कोठडीतून बाहेर येण्यास कमी कालावधी
  • मोदीच्या मोटारी व चित्रांचा लवकरच लिलाव नवी दिल्ली : ‘पीएनबी' बॅंकेची १३ हजार कोटी रुपयांची फसणूक करणारा हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या मालकीची १७३ चित्रे व ११ मोटारींचा लिलाव करण्यात येणार आहे. यासाठी मुंबईतील विशेष न्यायालयाने सक्तवसुली संचलनालयाला (ईडी) बुधवारी (ता. २०) परवनागी दिली. नीरव मोदी याच्या मालकीच्या १७३ चित्रांची किंमत ५७.७२ कोटी आहे. तसेच त्याच्याकडे रोल्स रॉईस, पोर्शे, मर्सिडिस व टोयोटा फॉच्युनर अशा महागड्या ११ मोटारी आहेत. पुढील महिन्यात याचा लिलाव होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बनावट हिरे विक्रीच्या स्वतंत्र गुन्हाच्या चौकशीत प्राप्तिकर विभागाने नीरव मोदी याची आणखी ६८ चित्रे जप्त केली असून, त्यांचाही लिलाव करण्यास विशेष न्यायालयाने परवानगी दिल्याची माहिती "ईडी'च्या अधिकाऱ्यांनी दिली. 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

    Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

    Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

    Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

    Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

    SCROLL FOR NEXT