Textile Industry
Textile Industry Agrowon
बाजार विश्लेषण

कापूस दरवाढीचा वस्त्रोद्योगाला फटका

टीम ॲग्रोवन

मागील ११ वर्षातील विक्रमी दर कापसाने (Cotton) गाठल्यामुळे आशियातील वस्त्रोद्योगांला (Textile) अडचणींना तोंड द्यावं लागतंय. रशिया आणि युक्रेन (Russia-Ukraine) यांच्यातील युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत गोंधळ उडलाय. त्यातच पेट्रोल- डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किमती गगनाला भिडल्यामुळे मालवाहतूक खर्चात वाढ झालीय. या युद्धाचा फटका वस्त्रोद्योगालाही बसला आहे.

आशियाई देशातील कापड निर्यात करणाऱ्या चीन आणि बांगलादेशमधील वस्त्रोद्योगाची स्थिति अधिकच बिकट झाली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे युरोपातील देशांशी असलेला व्यवहार मंदावला आहे. त्यातच युरोपातील देशांनी महागाईमुळे आशियातील देशांच्या मालाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे वस्त्रोद्योग कापसाऐवजी स्वस्त अशा कृत्रिम कापडाचा (सिंथेटिक फायबर) वापर करत आहेत, असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.

खर्चात बचत करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम कापड कापसाच्या तुलनेत स्वस्त पडतो. कृत्रिम कापडाची किंमत ०.६० पौंड आहे तर कच्च्या कापसाची किंमत १.४ पौंड आहे. त्यामुळे वस्त्रोद्योगाचा कल कृत्रिम कापड वापरण्याकडे आहे.

भारतातील लहान वस्त्रोद्योगाची अवस्था बिकट आहे. मागील तीन महिन्यांपूर्वीच्या कापडाची मागणी पूर्ण करण्यासाठी भारतीय वस्त्रोद्योग संघर्ष करत आहे. गेल्यावर्षी कापूस वेचणीच्या दरम्यान पाऊसाने हजेरी लावली होती. त्यामुळे उत्पादनात घट झाली आणि कापसाच्या किमती दुपटीने वाढल्या. इंडियाज टेक्सटाईल असोसिएशनचे अध्यक्ष जुनेजा म्हणतात, “अनेक छोट्या वस्त्रोद्योगांनी नव्यानं ऑर्डर घेण बंद करावं लागलं आहे.”

अलीकडेच दक्षिण भारतातील सूत गिरण्यांनी कापसाच्या वाढत्या दरामुळे गिरण्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. सूत कताई बंद करून कापसाची खरेदीही थांबवली आहे. देशातील बहुतांश कापड दक्षिण भारतातून निर्यात केला जातो. मात्र कापसाच्या वाढत्या दरामुळे मे महिन्यात सूत गिरण्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. आधीच करोनामध्ये ज्यांचा रोजगार थांबला होता, त्या कामगारांना त्यामुळे मोठा फटका सहन करावा लागतोय.

चीन सर्वाधिक वस्त्र निर्यात करतो. मात्र कोविड-१९ मुळे पुन्हा लॉकडाउन केले आहे. त्याचाही फटका चीनमधील वस्त्रोद्योगांना बसला आहे. चीनमधील शिनजियांग प्रत्येक महिन्याला ४० हजार टन कापूस वस्त्रोद्योगासाठी वापरला गेला. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रमाण अर्ध्यावर आले आहे. या भागात चीनच्या एकूण कापूस उत्पादनापैकी ८५ टक्के कापूस उत्पादित होतो.

बांगलादेश ६० टक्के कापडाची निर्यात युरोपातील देशांमध्ये करतो. मात्र पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे त्यावरही मर्यादा आल्या आहेत. “वस्त्रोद्योग सद्या तोटात सुरू असल्यामुळे आम्हाला फायदा होत नाही. कारण जागतिक व्यापार मंदावलेला आहे,” असे ढाक्यातील स्टर्लिंग ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक रहमान म्हणतात. अमेरिकेतही अशीच परिस्थिती फार वेगळी नाही. उष्णतेच्या लाटेमुळे अमेरिकेतील कापूस उत्पादनात घट झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

SCROLL FOR NEXT