pulses
pulses  
ॲग्रोमनी

डाळींच्या दरात दहा टक्के वाढ 

टीम अॅग्रोवन

मुंबई : पालेभाज्या, कांदा, बटाटा यांसह आता डाळींच्या दरही वधारले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारात तूरडाळ ९५ तर मूगडाळ १०५ रुपये किलोचे दर पोहोचले आहेत. टाळेबंदी व अतिवृष्टी याचा पुरवठ्यावर परिणाम झाल्याने घाऊक बाजारात किलोमागे दहा टक्के दरात वाढ झाली आहे. 

तीन ते चार वर्षांपूर्वी डाळींच्या दरात मोठी वाढ झाली होती. गेल्या वर्षी यात काही प्रमाणात दर कमी होते. मात्र गेल्या वर्षी डाळींचे उत्पादन घटले आहे. त्यात कोरोनाचे संकट आल्याने टाळेबंदीत आवक घटली. तर काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली. यामुळे डाळींची आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. परिणाम गेल्या महिन्यापासून डाळींचे दर वधारले आहेत. 

महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान येथून मुख्यत्वे मुंबई कृषी उत्पन्न बाजारात डाळींची आवक होते. बाजारात डाळींचे दर किलोमागे १० ते १२ रुपयांनी वधारले आहेत.  डाळींचे घाऊक दर (रुपये/किलो) 

डाळ पूर्वी आता 
तूर ८५ ९५ 
मूग ९५ १०५ 
हरभरा ५८ ६५ 

डाळींची आवक (क्विंटलमध्ये)  ऑगस्ट 

डाळ २०१९ २०२० 
हरभरा २३,८४९ १५,६५३ 
तूर ५६,२४९ ३९,८७१ 
मूग ३२,२९५ १९,०५७ 

सप्टेंबर 

डाळ २०१९ २०२० 
हरभरा १५,१०७ १४,३७६ 
तूर ५०,४३३ ४५,८१५ 
मूग २४,८९७ २०,७५७ 

प्रतिक्रिया कोरोना, टाळेबंदी आणि आता पावसामुळे बाजारात डाळींची आवक ५० टक्के कमी होत आहे. त्यामुळे घाऊक बाजारात डाळींच्या किमती १० टक्के वधारल्या आहेत. पुढील ८ ते १० दिवसांनी पुन्हा डाळींच्या किमती स्थिर राहतील.  - नीलेश वीरा, संचालक, धान्य बाजार समिती 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT