गवार
गवार 
ॲग्रोमनी

पितृपंधरवड्यामुळे सोलापुरात गवार, भेंडी तेजीत

Sudarshan Sutaar
सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात पितृपंधरवड्यामुळे गवार, भेंडीला मागणी वाढली. त्यांच्या दरातही तेजी राहिली. गवारीला सर्वाधिक ३५० रुपये तर भेंडीला ४०० रुपये प्रतिदहा किलोपर्यंत दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
 
बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवारची रोज ४० क्विंटल आवक झाली. भेंडीची रोज किमान १०० क्विंटल आवक होती. पण मागणीच्या तुलनेत आवक कमी राहिली. पण सध्या पितृपंधरवडा सुरू आहे. या पंधरवड्यात गवार, भेंडीला विशेष मागणी असते. त्यामुळे त्याला चांगला उठाव मिळाला. गवारला १०० ते ३५० रुपये तर सरासरी १५० रुपये आणि भेंडीसाठी २०० ते ४०० रुपये तर सरासरी ३०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला.
 
त्याशिवाय हिरवी मिरची, वांग्यालाही मागणी राहिली. हिरवी मिरचीलाही मागणी होती. हिरवी मिरचीला ७० ते २०० रुपये तर सरासरी १०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. वांग्याला १०० ते २५० रुपये तर सरासरी १६० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला.  
 
गेल्या दोन आठवड्यापासून फळभाज्यांच्या दरातही काहीशी तेजी आहे. भाज्यांच्या दरातही अशीच परिस्थिती पुन्हा होती. मूळात भाज्यांची आवक कमी होती. त्यात मेथी, कोथिंबीर, शेपूला उठाव राहिला. भाज्यांची आवक स्थानिक भागातून झाली. रोज प्रत्येकी १० ते २० हजार पेंढ्यांपर्यंत आवक होती. मेथीला शंभर पेंढ्यासाठी ६०० ते १०००, कोथिंबिरीला ७५० ते १२०० आणि शेपूला ३०० ते ७०० रुपये असा दर मिळाला.
 
बाजारसमितीत कांद्याचे दरही पुन्हा स्थिरच राहिले. कांद्याची आवक मात्र रोज ४०-५० गाड्यापर्यंत राहिली. कांद्याची आवक या सप्ताहात बाहेरून झाली. कांद्याला २०० ते २००० रुपये तर सरासरी ९०० रुपये क्विंटल रुपये असा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tomato Rate : टोमॅटोचे दर उतरलेलेच, मेथीच्या दरात वाढ, पावसाचा भाजीपाला मार्केटवर असा परिणाम

Onion Export : कांदा निर्यात परवानगीवरून राजकारण तापले! शरद पवारांसह राऊत यांची मोदींवर घणाघाती टीका

Soil Nutrient Management : जमिनीमध्ये संतुलित अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन

Rabadi Production Industry : रबडी निर्मितीद्वारे मिळवला दरांचा योग्य मोबदला

Hapoos Mango Prices : हापूस आंब्याच्या दरात घसरण, वादळी पावसाचा परिणाम

SCROLL FOR NEXT