दीडशे लाख क्विंटल कापूस शिल्लक
दीडशे लाख क्विंटल कापूस शिल्लक 
ॲग्रोमनी

दीडशे लाख क्विंटल कापूस शिल्लक

Chandrakant Jadhav

जळगाव : देशात आजघडीला सुमारे १५० लाख क्विंटल कापूस (३० लाख गाठी) शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. जानेवारीनंतर कापूस दरात फारशी वाढ झालेली नाही. तीन महिन्यांत दर क्विंटलमागे ४०० रुपयांनी घसरल्याने कापूस उत्पादकांचे सुमारे ६०० कोटींचे नुकसान झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.  सरकीच्या दरांवर दबाव राहिला. याच वेळी सरकीचे दर नोव्हेंबर २०१७ नंतर घसरतच राहिले. एप्रिल २०१८ मध्ये सरकीचे दर १४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले. परिणामी कापूस उत्पादकांना अपेक्षित दर मिळू शकले नाहीत व बाजारातील दरांवरचा दबाव कायम राहिला. यातच मागील आठ दिवसांत सरकीचे दर क्विंटलमागे २०० रुपयांनी वाढले आहेत. त्याचा सर्वंकष लाभ मात्र कापूस उत्पादकांना मिळू शकत नाही. कारण सुमारे ३४० लाख गाठींच्या कापसाची आवक बाजारात झाली आहे. अर्थातच एवढा कापूस व्यापारी, खरेदीदारांनी घेऊन त्यापासून रुई तयार केली आहे.  यंदाच्या हंगामात देशात ३७० लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज कॉटन असोसिएशनने जाहीर केला आहे. तर ११ कोटी १० लाख मेट्रिक टन सरकीचे उत्पादन हाती आले आहे. पाच क्विंटल कापसात सव्वातीन क्विंटल सरकी मिळते. सरकीचे दर दबावात राहिल्याने जिनींग व प्रेसिंग व्यावसायिकांना कमी मार्जीनने सरकीची विक्री करावी लागली, असे जाणकारांचे म्हणणे आहे. सरकीचे दर अलीकडेच वाढून ते १६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. तर रुईचे दर सध्या दर्जेदार खंडिला (३५६ किलो रुई) ४१००० रुपये व दुय्यम दर्जाच्या खंडिला ३८००० रुपये दर आहे. कापसाचे दर (जळगाव) ४७०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. तर किडक्‍या किंवा कमी दर्जाच्या कापसाला यापेक्षा कमी दर आहेत. जानेवारीच्या मध्यात कापसाचे दर ५१०० रुपये प्रतिक्विंटल होते. त्यात मध्यंतरी फारशी वाढ झाली नाही. देशात गुजरात व महाराष्ट्रात मिळून सुमारे २५ लाख गाठींचा कापूस शिल्लक आहे. तर तेलंगण, मध्य प्रदेश, कर्नाटकातही काही प्रमाणात शेतकऱ्यांकडे कापूस आहे. यातील कमाल कापूस उत्तम दर्जाचा आहे, असे सांगण्यात आले.  देशात अद्याप सुमारे १५० लाख क्विंटल कापूस शेतकऱ्यांकडे पडून आहे. पूर्वी ३६२ लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज होता. आता ३७० लाख गाठींचे उत्पादन होईल, असे संकेत आहेत. सरकीचे उत्पादन बऱ्यापैकी आहे. सरकीच्या दरात किंचीत वाढ झाली असून, यामुळे दर स्थिर राहतील.  - अनिल सोमाणी, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया मॉन्सून नव्या हंगामात चांगला बरसेल, असे संकेत आल्यानंतर बाजारात गाठींची खरेदी काहीशी कमी झाली आहे. पण कापूस दर स्थिर आहेत. जानेवारीनंतर सरकीचे दर घसरल्याने कापूस उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.  - दिनेश हेगडे, कापूस निर्यातदार, मुंबई आकडे दृष्टिक्षेपात

  • ५० लाख क्विंटल : कापूस देशात शेतकऱ्यांकडे शिल्लक
  • ६० लाख : गाठींची निर्यात
  • ११ कोटी १० लाख मेट्रिक टन : सरकीचे उत्पादन
  • ४१००० रुपये : उत्तम दर्जाच्या खंडीचा दर
  • २०० रुपयांनी : सरकीच्या दरात क्विंटलमागे वाढ
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

    Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

    Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

    Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

    Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

    SCROLL FOR NEXT