सोयाबीनवरील हिरव्या उंट अळीचे नियंत्रण
सोयाबीनवरील हिरव्या उंट अळीचे नियंत्रण 
कृषी सल्ला

सोयाबीनवरील हिरव्या उंट अळीचे नियंत्रण

डॉ. प्रशांत उंबरकर, डॉ. रूपेश झाडोदे

सद्य परिस्थितीत सोयाबीन वाढीच्या अवस्थेत असून काही भागामध्ये हिरव्या उंट अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. पेरणी नंतर सुरवातीच्या काळामध्ये पावसाची उघड आणि सततचे ढगाळ वातावरण यामुळे किडीच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. असेच पोषक वातावरण कायम राहिल्यास प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. ओळख :

  • अंडी गोल आकाराची असून पांढऱ्या रंगाची असतात.
  • अळी हिरव्या रंगाची असून चालताना उंटासारखा बाक काढते.
  • जीवन साखळी:

  • एक मादी आपल्या पूर्ण जीवन काळात ६५ ते १०० अंडी पानाच्या मागच्या बाजूला मध्य शिरेजवळ घालते. अळीच्या सहा अवस्था असतात.
  • अळी अवस्था १५ ते २१ दिवस आणि कोषावस्था ७ ते १० दिवसांची असते.
  • किडीचा संपूर्ण जीवन काळ २४ ते ३४ दिवस असतो.
  • नुकसान:

  • प्रथम अवस्थेतील अळ्या पानाचा हिरवा भाग खरवडून खातात.
  • मोठ्या अवस्थेतील अळ्या पानांचा सर्व भाग खातात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास पानाच्या फक्त शिराच दिसतात.
  • अळी फुले आणि शेंगांचे नुकसान करते.
  • एकात्मिक कीड व्यवस्थापन: १) पीक तण विरहीत ठेवणे. बांधावरील तणांचे नियंत्रण करावे. २) अळ्यांना वेचून खाणाऱ्या पक्ष्यांसाठी प्रती हेक्टरी १० ते १२ पक्षी थांबे लावावेत. ३) शेतात एकरी एक प्रकाश सापळा संध्याकाळी ६ ते रात्री १० पर्यंत लावावा. ४) पिकाचे सर्वेक्षण करून आर्थिक नुकसान पातळी प्रती मीटर ओळीत ४ अळ्या आढळून आल्यास रासायनिक कीडनाशकांची फवारणी करावी. फवारणी ः ( प्रति लिटर पाणी)

  • निंबोळी अर्क (ॲझाडिरेक्टीन १०, ००० पीपीएम) १ मिलि
  • प्रोफेनोफोस (५० इसी) २ मिलि. किंवा
  • क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ इसी) ०.३ मिलि.
  • कीटकनाशकांची गरजेनुसार आलटून पालटून फवारणी करावी. ( वरील कीटकनाशकांना लेबल क्लेम आहे)
  • संपर्क ः डॉ. प्रशांत उंबरकर,८२०८३७९५०१ (कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा, जि.वर्धा)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

    Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

    Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

    Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

    Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

    SCROLL FOR NEXT