soybean steam borer
soybean steam borer 
कृषी सल्ला

सोयाबीनवरील खोडमाशीचे व्यवस्थापन

डॉ. प्रमोद मगर, डॉ. एस. यू. नेमाडे

यवतमाळ जिल्ह्यामधील काही तालुक्यांमध्ये सोयबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळत आहे. राज्यामध्ये अन्य ठिकाणीही या किडीचा प्रादुर्भाव होताना दिसतो. सोयाबीनवरील खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाच्या रोपावस्थेमध्ये म्हणजेच पीक १५ ते २५ दिवसांचे असताना झाल्यास उत्पादनामध्ये लक्षणीय घट येते. अगदी दुबार पेरणीचे संकटही ओढवू शकते. सोयाबीनमध्ये पाने पिवळे पडण्याची विविध कारणे आहेत. झिंक किंवा लोह अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे किंवा तणनाशकाचा वापर झाला असल्यासही असे घडू शकते. मुख्य म्हणजे रसायनांच्या समंजस फवारण्या घ्याव्यात. खोडमाशीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर (१० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त) आढळल्यास शिफारशीत साधनांचा योग्य वापर करून सुरक्षित फवारणी करावी. खोडमाशी (Melanagromyza sojae)

  • अंडी, अळी, कोष आणि प्रौढ अशा चार अवस्था
  • प्रौढ माशी आकाराने लहान, काळसर आणि चमकदार असून २ मि.मी. लांब
  • संपूर्ण आयुष्यक्रमामध्ये ७० ते ८० अंडी घालते.
  • अंड्यातून निघालेली पाय नसलेली २-४ मिमी लांब अळी प्रथम सोयाबीनची पाने पोखरून नंतर पानाच्या देठातून मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करून आतील भाग पोखरून खाते.
  • प्रादुर्भाव पिकाच्या रोपावस्थेत झाल्यास कीडग्रस्त झाड वाळते. परिणामी, पुनः पेरणी करण्यास भाग पडते किंवा उत्पादनात लक्षणीय घट येते. मोठ्या झाडांवर प्रादुर्भाव झाल्यास प्रौढ माशीला बाहेर येण्यासाठी केलेले छिद्र आढळते.
  • अळी आणि कोषावस्था फांद्यात किंवा खोडातच पूर्ण
  • प्रादुर्भावग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते. उत्पादनात १६ ते ३० टक्क्यांपर्यंत घट येते.
  • नियंत्रण

  • प्रादुर्भावग्रस्त पाने, फांद्या आणि पानाच्या देठाचा अळीसह नायनाट करावा.
  • निंबोळी अर्क ५ टक्के किंवा कडूनिंब आधारीत कीटकनाशक (ॲझाडिरेक्टीन १० हजार पीपीएम) २ ते ३ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी.
  • आर्थिक नुकसानीची पातळी (सोयाबीनची १० टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे) ओलांडल्यास खालीलपैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी. पाण्याचा सामू ६ ते ७ दरम्यान ठेवावा.
  • फवारणी - (प्रति लिटर पाणी)

  • इथिऑन (५० इसी) १.५ ते ३ मिलि किंवा
  • इंडोक्झाकार्ब (१५.८ इसी) ०.६७ मिलि किंवा
  • क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मिलि किंवा
  • थायामेमिथोक्झाम (१२.६%) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५ % झेडसी) (संयुक्त कीटकनाशक) ०.२५ मिलि.
  • (टीप - वरील कीटकनाशकांना लेबल क्लेम आहे.)
  • संपर्क - डॉ. प्रमोद मगर, ७७५७०८१८८५ (विषय विशेषज्ञ- कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

    Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

    Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

    Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

    Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

    SCROLL FOR NEXT