उसावरील तपकिरी ठिपके रोग
उसावरील तपकिरी ठिपके रोग  
कृषी सल्ला

उसावरील तांबेरा,तपकिरी ठिपके रोगांचे नियंत्रण

पोपट खंडागळे, डॉ. सुभाष घोडके

गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा प्रभाव वाढत आहे. अशा वातावरणात ऊस पिकात तांबेरा, तपकिरी ठिपके या रोगांचा प्रादुर्भाव होतो. सद्यःस्थितीत कोल्हापूर, सातारा, सांगली या भागांत वरील रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. पहाटेच्या दवबिंदूंमुळे हवेमार्फत या रोगाचा प्रसार वाढतो. त्यामुळे त्यांचे वेळीच नियंत्रण करावे.

सद्यःस्थितीत आडसाली व पूर्वहंगामी उसावर या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. पूर्वी कमी प्रमाणात आढळणाऱ्या या रोगांचा आता ४० टक्के इतका प्रादुर्भाव वाढला आहे.

तपकिरी ठिपके :

  • रोगकारक बुरशी : सरकोस्पोरा लॉन्जिपस
  • जास्त पावसाच्या भागात प्रादुर्भाव होतो.  
  • रोगाचा प्रादुर्भाव हा रोपांपेक्षा ७ ते ८ महिने वयाच्या पिकावर होतो. जुन्या पानाच्या दोन्ही बाजूंवर अंडाकृती, लालसर ते तपकिरी ठिपके दिसतात. ठिपक्‍यांभोवती पिवळसर वलय दिसते.
  • प्रादुर्भाव वाढल्यास पानांवरील ठिपके एकमेकांत मिसळून मोठे होतात. ठिपक्‍यांमधील पेशी मरतात आणि प्रकाश संश्‍लेषण क्रिया खंडित होते.
  • प्रकाश संश्‍लेषण क्रिया मंदावल्यामुळे उसाच्या कांड्यांची लांबी व जाडी कमी होते. उसातील शर्करा व वजन घटते.
  • रोगाचा प्रसार ७५ ते ८० टक्के सापेक्ष आर्द्रता असलेल्या वातावरणात हवा, पावसाचे पाणी व दवबिंदूंमार्फत होतो.
  • को.८६०३२ व एमएस १०००१ या जातींवर या रोगाचा प्रादुर्भाव इतर वाणांपेक्षा कमी प्रमाणात होतो.
  • तांबेरा :

  • रोगकारक बुरशी : पुक्‍शीनिया कुहनाय
  • कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील नदीकाठच्या क्षेत्रात अधिक प्रादुर्भाव दिसून येतो.
  • को.सी. ६७१, को. ९४०१२, को.व्ही.एस.आय. ९८०५ या जाती अधिक बळी पडतात.
  • को. ८६०३२ व फुले २६५ या जातींवरसुद्धा हा रोग दिसून येतो.
  • सुरवातीस बुरशीची लागण पानाच्या दोन्ही बाजूस होते. पानावर लांबट पिवळे ठिपके दिसतात. त्यांची लांबी वाढून रंग लालसर तपकिरी होतो. ठिपके मोठे होऊन नारंगी रंगाचे बिजाणू बाहेर पडतात. ओलसर दवबिंदूंच्या वातावरणात त्यांचा प्रसार होतो.
  • ठिपक्‍यांमुळे पेशीद्रव्यपटल मृत होते. परिणामी प्रकाश संश्‍लेषण क्रियेत मंदावून ऊसवाढीवर विपरीत परिणाम होतो.
  • उपाययोजना :

  • प्रमाणित, बीजप्रक्रिया केलेले, रसरशीत, निरोगी व योग्य वयाचे बियाणे वापरावे. खोडवा उसाचे बेणे लागणीसाठी टाळावे.
  • वेळेवर आंतरमशागत करून शिफारशीत रासायनिक खतमात्रा द्याव्यात.
  • हवेमार्फत पसरणाऱ्या रोगांपासून ऊस पिकाच्या संरक्षणासाठी सिलिकॉन या मूलद्रव्याची उपलब्धता महत्त्वाची असते. त्यामुळे प्रतिहेक्‍टरी १.५ टन बगॅस राख अधिक सिलिकेट विरघळविणाऱ्या जीवाणूंचे खत २.५ लिटर या प्रमाणात वापर करावा.
  • एकरी ९ किलो सिलिकॉनयुक्त खतांच्या  वापराने उसातील रोगप्रतिकारशक्ती वाढल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. मात्र तशी विद्यापीठाची शिफारस नाही.
  • रासायनिक नियंत्रण (दोन्ही रोगांसाठी)  : फवारणी प्रतिलिटर पाणी

  • प्रोपिकोनॅझोल १ मि.लि किंवा
  • मॅन्कोझेब ३ ग्रॅम .
  • संपर्क : पोपट खंडागळे, ७३८७५०५०५७ (मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

    Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

    Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

    Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

    Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

    SCROLL FOR NEXT