weekly weather
weekly weather 
कृषी सल्ला

काही भागांत ढगाळ हवामानाची शक्यता

डॉ. रामचंद्र साबळे

गुरुवार, शुक्रवार (ता. १८, १९) ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्‍यता आहे. सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रता कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वसाधारणच राहील. कमाल व किमान तापमानात झालेली सध्याची वाढ कायम राहील. ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाशाचा कालावधी व तीव्रता मध्यम स्वरूपातच सर्वसाधारण राहील. फार मोठे हवामान बदल जाणवणार नाहीत. महाराष्ट्रावरील हवेचे दाब बुधवार (ता.१७) पासून १००८ हेप्टापास्कल इतके कमी होत आहेत. हवेचे दाब कमी होताच कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते. वारे प्रामुख्याने आग्नेय दिशेकडून वाहत आहेत. सोबत मोठ्या प्रमाणावर बाष्प वाहून आणून ढगनिर्मिती होऊन भारताच्या पश्‍चिम किनारपट्टीपासून जवळच्या पूर्वेकडील भागात पावसाची शक्‍यता आहे. त्यामुळे गुरुवार, शुक्रवार (ता. १८, १९) ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्‍यता आहे. सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रता कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वसाधारणच राहील. कमाल व किमान तापमानात झालेली सध्याची वाढ कायम राहील. ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाशाचा कालावधी व तीव्रता मध्यम स्वरूपातच सर्वसाधारण राहील. फार मोठे हवामान बदल जाणवणार नाहीत. किमान तापमान २० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक व कमाल ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहील. यापुढील काळात उष्णतेची तीव्रता वाढत जाईल. हवामान उष्ण व कोरडे राहील. कोकण  कमाल तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात ३७ ते ३८ अंश सेल्सिअस तर ठाणे, रायगड जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस राहील. या सर्वच जिल्ह्यांत किमान तापमानात २३ ते २४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होईल. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत आकाश निरभ्र, तर रायगड, ठाणे जिल्ह्यांत अंशतः ढगाळ राहील. मात्र बुधवार (ता. १७)पासून सर्वच जिल्ह्यांत ढगाळ हवामान राहण्याची शक्‍यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६१ टक्के, तर उर्वरित जिल्ह्यात ३१ ते ४७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १९ ते ३० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किमी राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. उत्तर महाराष्ट्र  नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ते ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, धुळे व जळगाव जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस, तर नंदूरबार जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक, जळगाव जिल्ह्यात २९ टक्के, तर धुळे, नंदूरबार जिल्ह्यात २१ ते २३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ ते १६ टक्के राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किमी आणि दिशा आग्नेयेकडून राहील. मराठवाडा  उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस, औरंगाबाद जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. बीड, परभणी व जालना जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस, तर नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत ते ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ ते २५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ ते २० टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १२ किमी आणि दिशा आग्नेयेकडून राहील. हवामान अत्यंत उष्ण व कोरडे राहील. पश्‍चिम विदर्भ  कमाल तापमान वाशीम जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ३५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १८ ते २२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ५ किमी आणि दिशा आग्नेयेकडून राहील. मध्य विदर्भ  यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.  सकाळची सापेक्ष आर्द्रता ३३ ते ३८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ ते २२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ५ किमी राहील. वाऱ्याची दिशा यवतमाळ जिल्ह्यात आग्नेयेकडून, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. पूर्व विदर्भ  कमाल तापमान चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस, तर भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ते २० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ४२ टक्के, तर दुपारची १७ ते २० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ किमी राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र  पुणे जिल्ह्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस, तर नगर जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. मात्र कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत ते ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर, पुणे व सोलापूर जिल्ह्यांत २३ ते २४ अंश सेल्सिअस तर नगर, सांगली, सातारा जिल्ह्यांत २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ४१ टक्के, तर उर्वरित जिल्ह्यात २७ ते ३४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १३ ते १६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १३ किमी राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. कृषी सल्ला 

  • उन्हाळी हंगामात शेवंतीची लागवड करावी. उन्हाळ्यात शेवंतीची वाढ चांगली होते व उत्पादन चांगले मिळते.
  • नारळाच्या झाडांच्या खोडावर गोल पातळ पत्रे बसवावेत. त्यामुळे उंदरांचा त्रास कमी होण्यास मदत होते.
  • गाभण जनावरांना योग्य प्रमाणात हिरवा, सुका चारा व खुराक द्यावा.
  • फळबागांवर ८ टक्के केओलीन द्रावणाची फवारणी करावी. त्यामुळे पानांमधील पाणी बाष्पीभवनाद्वारे जाण्यास प्रतिबंध होतो.
  • - (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Food distribution system : अन्नधान्याची सार्वजनिक वितरण प्रणाली

    Bhendwal Ghatmandni : दिल्लीच्या तख्तापासून शेतकऱ्यांच्या पीक पाण्यापर्यंत भेंडवळच भाकीत आलं समोर

    Maharashtra Politics : शेती आणि आरक्षणाचे विषय लोकसभेत आम्ही सातत्याने मांडले : सुप्रिया सुळे

    Onion Rate : नगर जिल्ह्यात कांदादर पडल्याने शेतकऱ्यांचा संताप

    Tomato Crop Disease : टोमॅटो पिकातील ‘जिवाणूजन्य मर’

    SCROLL FOR NEXT