outline for Button mutton project
बटण अळिंबी ही समशीतोष्ण अळिंबी म्हणून ओळखली जाते. या अळिंबीच्या वाढीसाठी थंड हवामानाची आवश्यक असते. वातावरण नियंत्रित युनिट्समध्ये योग्य पायाभूत सुविधा म्हणजेच कृत्रिम शीतकरण सुविधा (शीतकरण केंद्रे) वापरून हिची वर्षभर लागवड करता येते. यामध्ये पाश्चरायजेशन सुविधा आणि आधुनिक कंपोस्टिंग यार्डचा समावेश असतो. आजच्या लेखात व्यावसायिक बटण अळिंबी प्रकल्पासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि यंत्राची माहिती घेऊ. जागा आणि इतर आवश्यक बाबींची निवड
निवडलेली जागा लोकवस्तीपासून दूर असावी. भविष्यात प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी एकाच वेळी पुरेशी जमीन खरेदी करावी.जागा साधारणपणे वाहतूक रस्त्याजवळ असावी. जेणेकरून तयार उत्पादन तसेच कच्च्या मालाच्या वाहतुकीवरील खर्च कमी होईल.प्रकल्पाच्या जागी बारमाही पाण्याची मुबलक उपलब्धता असावी.सर्व कच्च्या मालाची, विशेषतः: भुसा/पेंढा, कुक्कुट खत इत्यादींची उपलब्धता जवळ असावी.प्रकल्पाच्या जवळील परिसरात मुबलक प्रमाणात स्वस्त मजुरांची उपलब्धता असावी.निवडलेल्या जागेवर अखंडित वीजपुरवठा असावा.उत्पादनांच्या विक्रीसाठी जवळपास बाजारपेठ असणे गरजेचे आहे. अळिंबी उत्पादन प्रकल्पासाठी आवश्यक घटक वर्षभर अळिंबीची लागवड करण्यासाठी वातावरण नियंत्रित मध्यम आकाराच्या प्रकल्पासाठी खालील बाबींची आवश्यकता असते. स्पॉन युनिट
ॲटोक्लेव्हिंग खोली : धान्य उकळण्यासाठी आणि बाटल्या किंवा पीपी पिशव्यांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी. इनॉकुलेषण कक्ष : निर्जंतुकीकरण केलेल्या बाटल्या किंवा पीपी पिशव्यांस इनॉकुलेषण करण्यासाठी. उष्मायन किंवा इन्कुबेषण वातानुकूलित खोली : इनॉकुलेटेड बाटल्या उष्मायनासाठी. शीतगृह : तयार स्पॉनच्या साठवणीसाठी.- याव्यतिरिक्त, कार्यालय, छोटी लॅब, वितरण क्षेत्र. आवश्यक यंत्रे : एअर कंडिशनर्स, लॅमिनार एअर फ्लो, ॲटोक्लेव्ह, बीओडी इन्कुबेटर, बॉयलर, बॉइलिंग कॅटल्स (उकळण्यासाठी किटली), रेफ्रिजरेटर, मांडण्या, पीएच मीटर, गॅस स्टोव्ह इत्यादी. काड भिजविण्याची जागा (उघडी जागा ) : कच्चा माल टाकण्यासाठी आणि तो ओला करण्यासाठी. कंपोस्टिंग यार्ड (झाकलेले) : ओल्या कच्च्या सामग्रीचा ढीग बनविण्यासाठी. फेज- १ बंकर : फेज-१ कंपोस्टिंगसाठी (इनडोर कंपोस्टिंग असल्यास). फेज- २ बोगदे : कंपोस्ट निर्जंतुक व कंडिशनिंग (आवश्यक सूक्ष्मजीव वाढविणे) करण्यासाठी. केसिंग माती कक्ष : केसिंग माती साठवण व निर्जंतुकीकरणासाठी. स्पॉनिंग क्षेत्र : तयार कंपोस्टचे स्पॉनिंग (स्पॉन/बी मिसळण्याची क्रिया) करण्यासाठी. इतर पायाभूत सुविधा : बॉयलर रूम, भूमिगत सेवा कक्ष, स्टोअर रूम, कामगारांच्या खोल्या इत्यादी. मध्यम आकाराचे युनिट : (२०० टन प्रती वर्ष पर्यंत) बॉयलर, ब्लोअर, एअर हॅन्डलिंग युनिट्स, डिजिटल थर्मामीटर, कंपोस्ट धारण बोर्ड, फेज - १ बंकरसाठी वायुवीजन यंत्रणा. मोठे युनिट : पुढच्या बाजूचा लोडर (बॉबकॅट) आणि टर्नर, फिलिंग लाइन, इतर कंपोस्ट हाताळणी उपकरणे. अळिंबी वाढ गृह (क्रॉपिंग युनिट)
अळिंबी वाढ गृहामध्ये उत्पादन क्षमतेनुसार ठराविक आकाराच्या खोल्या आवश्यक असतात. तसेच एसी किंवा कॉम्प्रेसर रूम, पॅकिंग शेड, मध्यभागी व्हरांडा आणि पाइपलाइन असतात.यंत्र सामग्री ः उष्णतारोधक दरवाजे, मध्यवर्ती शीतकरण यंत्रणा (अमोनिया किंवा फ्रीऑन आधारित), एअर हॅन्डलिंग युनिट्स (एएचयु), संगणक आधारित नियंत्रक, मांडण्या, ट्रॉली, कापणी ट्रे, विद्युत पुरवठ्यासाठी आवश्यक क्षमतेचा जनरेटर. काढणीत्तोर हाताळणी कक्ष (पोस्ट हार्वेस्ट हॅन्डलिंग युनिट)
प्री-कुलिंग चेंबर (कोल्ड रूम) ः कॅनिंग पूर्वी अळिंबी साठवण्यासाठी किंवा विक्रीसाठी पॅकिंग पूर्वी प्री-कुलिंग करण्यासाठी.कॅनिंग हॉल ः कॅनिंग प्रक्रियेसाठी लाइन बसविणे.प्रयोगशाळा ः प्रक्रियेच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी.स्टोअर रूम ः कॅनिंग प्रक्रिया केलेल्या कॅनच्या साठवणीसाठी.कामगारांना बसण्यासाठी खोली.यंत्र सामुग्री ः इच्छित क्षमतेची कॅनिंग लाइन सर्वसाधारण मांडणी प्रकल्पाची अळिंबी उत्पादन क्षमता लक्षात घेऊन कमीत कमी जागेत सर्व पायाभूत सुविधांचे उभारणी योग्यरितीने होईल, असे आराखड्याचे नियोजन करावे.
अळिंबी फार्मच्या आराखड्याची आखणी काळजीपूर्वक करावी. जसे जागेची निवड, पक्के रस्ते, कच्चा माल साठविण्याची जागा इत्यादी.कंपोस्टिंग यार्डची जागा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला असावी. म्हणजेच वारा जास्तकरून पीक वाढ गृहाच्या क्षेत्रापासून कंपोस्टिंग यार्डच्या दिशेने वाहायला पाहिजे. किंवा कंपोस्टिंग यार्ड मुख्य युनिटपासून १ ते २ किमी दूर असावे.कामकाजाच्या सोयीसाठी तसेच उष्णतेचे नुकसान टाळण्यासाठी फेज-१ बंकर एका ओळीत सरळ बांधलेले असावेत. त्यांच्या जवळच फेज-२ चे बोगदे बांधावेत.फेज-२ चे बोगदे स्पॉनिंग क्षेत्रामध्ये कंपोस्टिंग यार्डपासून दूर उघडणारे असावेत.स्वच्छता राखणे तसेच रोग-किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पीक वाढ खोल्या (क्रॉपिंग रूम) कंपोस्टिंग क्षेत्रापासून दूर तयार कराव्यात.केसिंग निर्जंतुकीकरण कक्ष कंपोस्टिंग यार्डच्या जवळ किंवा लहान प्लॅटफॉर्मसह कंपोस्टिंग यार्डमध्ये तयार करावा.भविष्यात प्रकल्पाच्या विस्तारासाठी कंपोस्टिंग यार्ड, फेज-१ बंकर, फेज-२ बोगदे, क्रॉपिंग रूम यांच्या बांधकामासाठी पुरेशी मोकळी जागा योग्य ठिकाणी ठेवावी.स्पॉन युनिट कंपोस्टिंग यार्डपासून दूर आणि पीक वाढ खोल्यांच्या अगदी जवळ बांधावे.प्रक्रिया युनिट हे पूर्णपणे स्वतंत्र किंवा क्रॉपिंग इमारतीमध्ये देखील तयार करता येते.सर्व इमारतींचा पाया टणक जागेवर खोदावा.वास्तविक बांधकाम सुरू होण्यापूर्वी भूमिगत पाण्याचे पाइप, विजेच्या तारा आणि गटारे यांचे योग्य प्रकारे नियोजन करून काम करावे.सुरक्षिततेसाठी संपूर्ण युनिटच्या बाजूने कुंपण किंवा विटांची पक्की भिंत घालावी.जागा कमी असलेल्या ठिकाणी दुमजली पीक वाढ खोल्या तसेच इतर सेवांसाठी बांधकाम करता येते.- डॉ. अनिल गायकवाड, ९४२०४९८८११ (लेखक अळिंबी तज्ज्ञ आहेत.)