‘एकात्मिक व्यवस्थापनातून एकरी १०० टन ऊस उत्पादन शक्य’
‘एकात्मिक व्यवस्थापनातून एकरी १०० टन ऊस उत्पादन शक्य’ 
इव्हेंट्स

‘एकात्मिक व्यवस्थापनातून एकरी १०० टन ऊस उत्पादन शक्य’

टीम अॅग्रोवन

आळेफाटा, जि. पुणे : मातीपरीक्षणानुसार खतांचा योग्य वापर, तणनियंत्रण, रासायनिक व जैविक बेणेप्रक्रिया तसेच पाणी, खतांचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन केल्यास एकरी शंभर टनांपेक्षा अधिक ऊस उत्पादन वाढीचे उद्दिष्ट गाठणे शक्य आहे, असा सल्ला शिरोली येथील प्रयोगशील शेतकरी सुभाष मोरे यांनी दिला.        पारगावतर्फे आळे येथे श्री मुंजोबा मंदिरात ‘अॅग्रोवन’ व स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज लि. यांच्या वतीने ऊस लागवड आणि व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी संभाजी चव्हाण होते. चर्चासत्राला स्मार्टकेम टेक्नाॅलॉजीजचे विभागीय विक्री अधिकारी उदयसिंह कदम, प्रतिनिधी योगेश गरुड, अभिजित पाटील, महेश नेहरकर, संजय चावरे, प्रगतशील शेतकरी विकास चव्हाण, उपसरपंच रामदास तट्टू, विघ्नहर कारखान्याचे संचालक किरण तट्टू, किसन डुकरे, स्मार्ट व्हिलेजचे प्रतिनिधी मंदार जाधव, स्थानिक वृत्तपत्र विक्रेते रवींद्र फाकटकर, सखाराम खिलारी आदी मान्यवर उपस्थित होते.   सुभाष मोरे म्हणाले, की जमिनीत सेंद्रिय कर्ब आणि पाने सशक्त असणे आवश्यक आहे. योग्य बेण्याची निवड, बेणे प्रक्रिया, सुधारित पद्धतीने लागवड आणि शिफारशीनुसार खत आणि पाणी व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे. चर्चासत्रामध्ये विकास चव्हाण यांनी ऊस पाचट व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या वेळी उदयसिंह कदम यांनी महाधनच्या विविध उत्पादनांबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘अॅग्रोवन’चे वरिष्ठ व्यवस्थापक संभाजी घोरपडे यांनी केले. सूत्रसंचालन वरिष्ठ अधिकारी महेश चौखंडे यांनी केले. आभार उपसरपंच रामदास तट्टू यांनी मानले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT