Fish Farming
Fish Farming Agrowon
कृषी पूरक

मत्स्य संवर्धनाची पूर्वतयारी कशी कराल ?

Team Agrowon

तलावातील पाण्यात अनुकूल वातावरण निर्माण करून त्यात निवडक माशांची जोपासना करून जास्तीत जास्त मत्स्योत्पादन मिळवणे म्हणजेच मत्स्यसंवर्धन (Fish Farming) होय. मत्स्यसंवर्धन तलावांमध्ये मत्स्यबीज सोडण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी करणे खूप गरजेचे असते. मत्स्य संवर्धनाची पूर्वतयारी केल्याने माशांच्या भरघोस उत्पादनाची हमी मिळते. आधुनिक पद्धतीने मत्स्य संवर्धनाची पूर्वतयारी करण्यासाठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने खाली नमूद केलेल्या मशागतींचा वापर करावा.

मत्स्य संवर्धनासाठी जागेची निवड कशी करावी ?
-पाणी धरून ठेवणारी, चिकन माती, गाळाची किंवा काळी माती असलेली जमीन निवडावी.
-सातत्याने आणि मुबलक पाणी पुरवठ्याची सोय असावी.
-निवडलेली जागा साधारणतः अल्कधर्मी म्हणजे पीएच ७.५ ते ८ असावा.
-तळे बांधण्यापूर्वी पर्जन्यमान, पूरस्थिती, पाण्याचा निचरा इत्यादी बाबींचा विचार करावा.
-सुमारे दोन ते चार हेक्टर क्षेत्रफळाची जमीन आवश्यक असते. प्रत्येक तलावाचे क्षेत्रफळ ०.४ ते ०.१ हेक्टर असावे. असे तळे आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरते.
-मत्स्यसंवर्धन तलाव बहुधा आयाताकृती असावा. सुमारे १०० मीटर लांब आणि ४० मीटर रुंद आकाराचे २ ते ३ मीटर खोलीचे मत्स्यतळे तांत्रिक दृष्ट्या अधिक फायद्याचे ठरते.
-बांधाची उंची पाण्याच्या इष्टतम पातळीपेक्षा किमान एक मीटर जास्त ठेवावी. बांधाच्या एक मीटर उंचीसाठी बांधाचा पाया १.५ मीटर रुंद ठेवावा. म्हणजे उताराचे प्रमाण १:१:५ असे असावे.

संवर्धनासाठी माशांची निवड
संवर्धनाकरिता प्रामुख्याने भारतीय प्रमुख कार्प मासे उदा ः सायाप्रिन्स, गवत्या आणि चंदेरा इ. माशांची निवड करावी.
-गोड्या पाण्यातील कोळंबी संवर्धनासाठी उदा ः मॅक्रोबॅकीयम रोझेनबर्ग व मॅक्रोबॅकीयम मालकमसोनी इ. प्रजातींची निवड करावी.
-हवामानाशी जुळवून घेणाऱ्या आणि वाढीचा वेग उच्चतम दर्जाचा असणाऱ्या मत्स्य प्रजातींची निवड करावी.
-पुनरुत्पादनास योग्य अशा प्रजातीची निवड करणे फायद्याचे असते.
-पाण्याच्या तळाकडील मध्यभाग आणि पृष्ठभागातील नैसर्गिक अन्नाचा पूर्ण उपयोग करणाऱ्या माशांच्या प्रजाती निवडाव्यात.
-बाजारात मागणी असणाऱ्या आणि चांगला विक्री दरही मिळेल अशा माशांचे निवड करावी

मद्यसंवर्धनाचे प्रकार
- कार्प व मागूर माशांचे संवर्धन, कोळंबी संवर्धन, शोभिवंत माशांचे संवर्धन, निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी व इतर माशांचे संवर्धन.
- एकात्मिक पद्धतीमध्ये मत्स्यसंवर्धना बरोबरच बदक पालन, कुक्कुटपालन, वराहपालन, भात शेती आणि तलावाच्या बांधावर केळी, संत्रा यासारख्या फळबागांची लागवड करता येते यालाच एकात्मिक मत्स्यसंवर्धन म्हणतात.

तलावाची पूर्वतयारी
-मत्स्यसंवर्धनाला सुरुवात करण्याअगोदर तलाव उन्हाळ्यात पूर्णपणे कोरडा करून सुकविण्यामुळे कुजलेल्या वनस्पती, प्राणी मातीत एकरूप होतात आणि पर्यायाने तळाची उत्पादकता वाढते.
-तळे सुकविण्याचा आणखी एक फायदा म्हणजे संहारक मासे व इतर अनावश्यक प्राण्यांचा नाश होतो.
-संवर्धनापूर्वी तलावात चुना मिसळल्यामुळे तलावाच्या तळाशी साठलेले विषारी वायू नाहीसे होतात. आम्लाचा निर्देशांक वाढवून तो स्थिर राहण्यास मदत होते. पाण्यात असणारे अतिरिक्त जैविक घटक चुन्यामुळे मोकळे झाल्यामुळे वनस्पती व प्राणी प्लवंगाची वाढ मुबलक प्रमाणात होते. मत्स्यबीजांची रोग होण्याची शक्यता कमी होते. चुनखडी ची भुकटी हेक्टर क्षेत्राला २५० किलो या प्रमाणात तळ भागावर पसरवतात किंवा तळ्याच्या पाण्यात मिसळतात. जमीन आम्लधर्मी असल्यास चुन्याची मात्रा १०० किलो पर्यंत वाढवावी. जमीन अल्कधर्मी असेल तर चुन्याची मात्रा २०० किलो पर्यंत कमी करावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्ण लाटेचा इशारा

Soybean Rate : हिंगोली, परभणी बाजार समित्यांत सोयाबीन दर कमी

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

SCROLL FOR NEXT