bussiness opportunities in backyard poultry farming
bussiness opportunities in backyard poultry farming 
कृषी पूरक

परसबागेतील कुकुटपालनातून उत्पन्नाची संधी

देवानंद राउत, कु .नम्रता राजस

कृषीपूरक व्यवसायामध्ये परसबागेतील कुक्कुटपालन हा शेतकऱ्यांना सोयीस्कर आणि तुलनेने सोपा व्यवसाय ठरू शकतो. यामध्ये पारंपारिक पद्धतीने देशी कोंबड्या पाळल्या जातात. या कोंबड्याची अंडी (६० ते ७० नग प्रती वर्ष ) व मांस उत्पादन अत्यंत कमी असल्याने अपेक्षित उत्त्पन्न मिळत नाही त्यासाठी नवीन विकसित जातीचा परसबागेतील कुकुटपालनासाठी अवलंब केल्यास ग्रामीण भागातील अंडी व मांस उत्पादनात वाढ होते. कुटुंबाच्या पोषक आहाराच्या विशेषतः प्रथिनांची गरज घरगुती पातळीवर पूर्ण करणे शक्य होते. हा व्यवसाय भूमीहीन शेतमजूर महिलांसाठी चांगला रोजगार पुरवू शकतो.हा व्यवसाय चालू करण्याआधी आपल्याला नेमके कशाचे (अंडी किंवा मांस या पैकी) उत्पादन घ्यायचे आहे, याचा विचार करावा. त्यानुसार पक्ष्यांच्या जातीची निवड करणे गरजेचे आहे. परसबागेतील कोंबडी पालनासाठी उपयुक्त सुधारित जाती पुढील प्रमाणे आहेत. वनराज

  • ही जात अंडी व मांस उत्पादनात उपयुक्त आहे
  • रोग प्रतिकारक क्षमता उत्तम आहे
  • मुक्त संगोपन पद्धतीत जुळवून घेण्यास सक्षम आहे
  • योग्य आहार व्यवस्थापन केल्यास नर कोंबडयाचे ८ ते १० आठवड्यात एक ते सव्वा किलो वजन मिळते
  • एका वर्षामध्ये अंडी उत्पादन १६० ते १८० अंडी मिळते.
  • गिरीराज

  • ही जात मांस उत्पादनासाठी उपयुक्त आहे
  • २०ते २२ आठवड्यात अंडी उत्पादनात सुरवात.
  • या जातीची कोंबडी प्रती वर्षी १७० ते १८० अंडी देते.
  • पूर्ण वाढ झालेल्या नराचे वजन ३ ते ३.५ किलो असते, तर मादी पंक्ष्याचे वजन २.५ ते ३ किलो मिळते.
  • सुवर्णधरा

  • ही जात अंडी, मांस आणि मिश्र संगोपन करण्यास उपयुक्त आहे
  • २२ ते २३ आठवड्यात या जातीची मादी ३ किलो वजनाची होते, तर नर अंदाजे ३.५किलो वजनाचा होतो.
  • अंडी उत्पादन एका वर्षात अंदाजे १९० ते २०० अंडी देते
  • परसबागेतील व्यवस्थापन खाद्य व्यवस्थापन

  • परसबागेतील कोबडीसाठी प्रती पक्षी ६० ग्रॅम या प्रमाणे खाद्य द्यावे. खाद्य देण्यासाठी ब्रॉयलर फिडर प्रकारची प्लॅस्टिकची भांडी वापरल्यास नासाडी टाळता येते.
  • चांगले उत्पादन आणन आर्थिक लाभासाठी कोंबड्याच्या खाद्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हंगामानुसार उपलब्ध असणारे खाद्य कोबड्यांना द्यावे. मात्र, त्यासोबत योग्य पोषणासाठी धान्यासोबत पोषणयुक्त आहार दिला पाहिजे.
  • पोषक आहारामध्ये प्रथिने, खनिजे, क्षार मिश्रण आणि जीवनसत्त्वे याचा समावेश असावा. असा पोषक आहारा आपण घरगुती पातळीवरही तयार करू शकतो.
  • घरच्या घरी खाद्य निर्मितीचा नमुना   

    वापरावयाचे घटक प्रमाण टक्केवारी
    भरडलेला मका ३८ भाग
    सोयामिल ४० भाग
    तांदळाची कणी १९ भाग
    जीवनसत्व पावडर ०.१० भाग
    खनिज क्षार पावडर ०.२० भाग
    डाय कॅल्शिअम फॉस्फेट १.०० भाग
    लाईमस्टोन पावडर १.०० भाग
    मीठ ०.५० भाग

    पाणी व्यवस्थापन

  • पिलाना स्वच्छ पाणी पिण्यासाठी द्यावे. पाण्यासाठी प्लॅस्टिकची रेडिमेट भांडी वापारावी.
  • पिण्याचे पाणी निर्जंतुक करण्यासाठी पाण्यामध्ये प्रति १० लिटर साठी १ मिली सोडियम हायपोक्लोराईड वापरावे.
  • रोगप्रतिबंधक उपाय

  • देशी कोंबड्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती चांगली असते. परिणामी रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. मात्र, विषाणूजन्य प्राणघातक आजार टाळण्यासाठी लसीकरण करावे
  • सर्व कोंबड्याना वेळेच्या वेळी लसीकरण द्यावे. जंत नाशक द्यावे.
  • आपल्याकडील कोंबड्या आजारी पडल्यास त्यांना निरोगी कोंबड्या पासून वेगळे ठेवावे. जर कोंबडी आजारांनी दगावली तर पशुवैद्यकाकडून शवविच्छेदन करावे, यामुळे आजाराचे निचित कारण समजून येते. इतर कोंबड्याच्या आजारापासून बचाव करणे शक्य होते.
  • दर सहा महिन्यातून एकदा मान मोडी प्रतिबंधक व देविरोग प्रतिबंधक लस टोचून घ्यावी. लसीचा ताण कमी करणाऱ्या औषधांचा वापर पिण्याच्या पाण्यासोबत करावा.
  • लसीकरण सकाळी किंवा संध्याकाळी करावे.
  • पक्षी अंड्यावर येण्यापूर्वी अंडी उत्पादन वाढवण्यासाठी कॅल्शियमयुक्त औषध २० मिली प्रती १०० पक्षी या प्रमाणात द्यावे, त्यामुळे अंडी उत्पादन वाढते.
  • प्रजनन व्यवस्थापन  एकदा कोंबड्या खरेदी केल्यानंतर बऱ्याच काळासाठी त्याच कोंबड्या व नर प्रजननासाठी वारंवार वापरण्यात येतात. कालांतराने त्यामध्ये प्रजनन संदर्भातील समस्या आढळून येते. त्याला अंत प्रजनन असे म्हणतात. या मुळे पिल्लांमध्ये मरतुकीचे प्रमाण वाढते, अंडी देखील खराब दर्जाची असतात. प्रजननासाठी वापरण्यात येणारा नर दरवर्षी बदलावा. यामुळे अंडी उत्पादन आणि प्रजननाची क्षमता चांगली राहते. मरतुकीचे प्रमाण कमी होते. संपर्क- देवानंद राउत, ७०२०५३२८२० (विषय तज्ज्ञ - पशुसंवर्धन व दुग्ध व्यवस्थापन, कृषी विज्ञान केंद्र, सांगवी (रेल्वे ), ता. दारव्हा, जि. यवतमाळ.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

    Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

    Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

    Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

    Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

    SCROLL FOR NEXT