snake bite
snake bite  Agrowon
काळजी पशुधनाची

पावसाळ्यात सर्पदंशाचे प्रकार वाढतात?

Team Agrowon

सर्व साधारणपणे पावसाळ्यात उंदरांची बिळे पाण्याने भरली जातात. परिणामी उंदीर निवाऱ्यासाठी इकडे-तिकडे फिरत राहतात. काही वेळेस हे उंदीर, गोठ्याची पडकी बाजू, खाच-खळगे, चारा साठवून ठेवलेली जागा याठिकाणी जाऊन बसतात. हिरव्या चाऱ्याच्या हव्यासापोटी जनावरे गवताच्या दाटीमध्ये जातात. अशा दाटीच्या ठिकाणी साप असण्याची शक्यता जास्त असते.

दाटीवाटीच्या भागात जनावर चरत असताना, त्यांना सर्पदंश होत असतो. सर्पदंश जनावरांच्या मानेभोवती, कासेवर, तोंडाजवळ, पायाला, शेपटीला होत असतो. सर्पदंशाच्या खुणा वेळेत न पाहिल्यास जनावरांच्या मज्जातंतूवर परिणाम झालेला दिसून येतो. जनावरांना श्वसनाला त्रास होतो. यासाठी पावसाळ्यात विशेषकरून जनावरे चरून आल्यानंतर त्यांचे निरीक्षण करणे गरजेचं आहे.

सर्पदंशाची लक्षणे

सर्पदंश झालेल्या ठिकाणी सूज येते. सर्पदंश झालेल्या जनावरांच्या तोंडातून फेस येतो, लाळ गळायला लागते.

सर्पदंशाच्या जागेतून रक्त बाहेर पडत असते. जनावर लंगडायला लागते.

जनावराला श्वसनास अडचण होते. जनावराची लघवी लाल होते.

जनावरांच्या मज्जातंतूचे नियंत्रण जाते. दंश केलेली जागा गळून पडते.

डोळयाच्या बाहुल्यासूज आल्याने लाल दिसू लागतात.

जनावरांच्या शेणातून आणि लघवीतून रक्त येते.

शवविच्छेदनात साप चावल्याच्या जागी खूप जास्त रक्तपात दिसून येते.

सर्पदंशाचे निदान करण्यासाठी –

रक्त चाचणी केल्यास प्लेटलेटची संख्या कमी झालेली झालेली दिसून येते.

जनावराचा रक्त साखळण्याचा कालावधी वाढलेला दिसून येते.

रक्तातील युरियाची मात्रा वाढलेली दिसून येते.

सर्पदंश टाळण्यासाठी उपाय –

सुरुवातीला तर जनावरांच्या गोठ्याच्या परिसरात उंदरांचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी. गोठ्यात तसेच गोठ्याच्या परिसरात अडगळ निर्माण होणार नाही यासाठी दक्षता बाळगावी. पावसाळ्यात गोठयाच्या आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करून घ्यावी. घनदाट जंगलात किंवा जनावरांना चरण्यासाठी घेऊन जावू नये. जनावरे चरून आणल्यानंतर त्याचे निरीक्षण करावे.

सर्पदंश झाल्यावर विष जनावरांच्या रक्तामध्ये मिसळत असते. यासाठी प्राथमिक उपचार म्हणून, सर्पदंश झालेल्या ठिकाणच्या वरील बाजूस घट्ट दोरी किंवा पट्टीने बांधून घ्यावे. असे केल्याने विष जनावरांच्या शरीरात पसरणार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT