शेततळे
शेततळे 
ॲग्रो गाईड

शेततळ्याची निर्मिती कशी करावी ?

मृद्‌ व जलसंधारण अभियांत्रिकी विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उपलब्ध असलेल्या खोलगट भागात योग्य आकारमानाचे व आकाराचे शेततळे करावे. जागा निवडताना शेतातील सर्व पाणी त्या निवडलेल्या जागेजवळ एकत्रित येईल याप्रमाणे वळवावे. शक्‍यतोवर खोलगट, शेताच्या खालच्या बाजूची जमीन निवडावी. पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गावरील जागा निवडू नये. कारण अशी जागा निवडल्यास तळी गाळाने लवकर भरतात, त्यामुळे शेततळे प्रवाहाच्या बाजूला थोड्या अंतरावर खोदावे.      शेततळ्यातील पाण्याचा पाझर कमी करण्यासाठी शेततळ्यास अस्तरीकरण करणे गरजेचे आहे. अस्तरासाठी प्लॅस्टिक फिल्म वापरताना त्याची जाडी ३०० ते ५०० जीएसएम असावी. शेततळी ही काळ्या खोल जमिनीत बांधली गेली असतील तर अशा जमिनीत पाणी जास्त झिरपते, त्यामुळे पाण्याचे प्रमाण कमी राहते; शेततळ्यात गाळ राहण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळे काही कालांतराने शेततळ्याची पाणी साठवण क्षमता कमी होते.      शेततळे घेण्यापूर्वी मृद्‌ व जलसंधारणाचे उपाय करावेत. त्यामुळे पावसाच्या वाहून येणाऱ्या पाण्याबरोबर गाळ वाहून येणार नाही. शेततळ्यात गाळ येऊ नये म्हणून पाण्याचा प्रवाह ज्या ठिकाणी शेततळ्यात प्रवेश करतो, त्या अगोदर २ बाय २ बाय १ मीटर आकाराचे खोदकाम करावे आणि पाणी ज्या बाजूने निर्गमित होते त्या ठिकाणी गवत लावावे. त्यामुळे गाळ खड्ड्यामध्ये साचेल आणि प्रवाहाबरोबर आलेल्या गाळाची गवताच्या पानांमुळे गाळणी होईल.     इनलेट व आउटलेट (प्रवेशद्वार व निर्गमद्वार) प्रवेशद्वाराच्या अगोदर साधारण दोन मीटर अंतरावर २ बाय २ बाय १ मीटर आकाराचा सिल्ट ट्रॅपचे (गाळ साठणारा पिंजरा) खोदकाम करावे. शेततळ्याच्या दोन्ही द्वारांजवळ दोन मीटर लांबीपर्यंत दगडाची पिचिंग करावी. शेततळ्याला काटेरी तार किंवा लाकडाचे कुंपण करावे. जेणेकरून जनावरांचा त्रास होणार नाही. संपर्क ः ०२४५२- २२३८०१,  विस्तार क्र. ३५७. मृद्‌ व जलसंधारण अभियांत्रिकी विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT