चिकू कळी पोखरणारी अळी
चिकू कळी पोखरणारी अळी  
ॲग्रो गाईड

चिकू पीक सल्ला

डाॅ. एस. बी. गंगावणे,  ए. एस. ढाणे

चिकू फळपिकात सद्यस्थितीत फळातील बी पोखरणारी अळी, फुलकळी पोखरणारी अळी, पाने व कळ्या खाणारी अळी, खाेड पोखरणारी अळी आदी किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. झाडांची दाटी असल्यास या किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात.

फळातील बी पोखरणारी अळी : कारणे :   या अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने जुन्या बागांमध्ये आढळतो. अशा बागांमध्ये मोठी आणि एकमेकांत फांद्या मिसळलेली झाडांमुळे पुरेसा सूर्यप्रकाश व हवा खेळती राहत नाही. अशा बागांमध्ये फवारणी व आंतरमशागत परिणामकारकरीत्या होत नाही. बागेकडे दुर्लक्ष आणि अस्वच्छता हे या अळीच्या प्रादुर्भावाचे प्रमुख कारण ठरते.  नियंत्रण :  बागेत स्वच्छता राखावी.  झाडांची योग्य छाटणी करून बागेत पुरेसा सूर्यप्रकाश येईल, असे नियोजन करावे.  झाडावरील कीडग्रस्त व गळालेली सर्व फळे व पालापाचोळा गोळा करून जाळून नष्ट करावीत.  रासायनिक नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर 

  • इंडोक्झाकार्ब (१४.५ टक्के) ०.५ मि.लि. किंवा
  • नोव्हॅल्युराॅन (१० टक्के) ०.५ मि.लि. किंवा 
  • डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के) १ मि.लि. किंवा 
  • निंबोळी अर्क - ५ टक्के किंवा 
  • अॅझाडिरॅक्टीन (५०,००० पीपीएम) - ०.५ मि.लि.  सूचना : फवारणीपूर्वी फळे काढावीत.
  • फुलकळी पोखरणारी अळी : नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर 

  • इमामेक्टीन बेंझोएट (५ टक्के) ०.४५ ग्रॅम किंवा 
  • डेल्टामेथ्रिन (२.८ टक्के) १ मि.लि. किंवा 
  • लॅम्डा सायहॅलोथ्रिन (५ टक्के) १ मि.लि. किंवा 
  • अॅझाडिरॅक्टीन (५०,००० पीपीएम) - ०.५ मि.लि. 
  • पाने आणि कळ्या खाणारी अळी : नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर 

  • क्विनाॅलफाॅस (२५ टक्के) २ मि. लि. किंवा 
  • निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा 
  • अॅझाडिरॅक्टीन (५०,००० पीपीएम) - ०.५ मि.लि.  सूचना : अळीने फांद्यावर तयार केलेली पानांची जाळी आतील अळीसह काढून त्यांचा नाश करावा.
  • खोड पोखरणारी अळी :  नियंत्रण : - ही अळी खोडाच्या सालीखालील पेशीवर उपजीविका करते. अळीचा मार्ग शोधून अळीचा नायनाट करावा. कीडग्रस्त  फांद्या काढून जाळून टाकाव्यात. खोडावरील अथवा फांद्यावरील क्लोरपायरीफॉस (२० इ.सी.- २ मि.लि. प्रतिलिटर पाणी) द्रावणात बुडविलेल्या कापसाच्या बोळ्याने चिमट्याच्या सहाय्याने बंद करावे. 

    संपर्क :  ए. एस. ढाणे, ७०२८०६५६२६,  (कृषी संशोधन केंद्र, पालघर, जि. पालघर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Weather Update : विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्ण लाटेचा इशारा

    Soybean Rate : हिंगोली, परभणी बाजार समित्यांत सोयाबीन दर कमी

    Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

    Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

    Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

    SCROLL FOR NEXT