Sun-drying of grains
Sun-drying of grains 
ॲग्रो गाईड

साठवणूकीतील कीडी रोखण्यासाठी उपाययोजना

हरिष फरकाडे, कांचन मारवाडे

शेतीमालाच्या साठवणुकीच्या किफायतशीर आणि पर्यावरणपूरक अशा पारंपरिक पद्धतींची माहिती मागील भागामध्ये घेतली. या भागामध्ये साठवणूकीतील किडीपासून धान्याचे रक्षण करण्याविषयी माहिती घेऊ. मळणीपूर्वी धान्य स्वच्छ करून घ्यावे. धान्य मळणी करण्याची जागा स्वच्छ, किडींपासून मुक्त असावी. ती शक्यतो लोकवस्ती व धान्य साठवणीपासून दूर असावी. मळणी केल्यानंतर दाणे चांगले वाळवावेत. धान्यात १० टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा नसावा. कोठ्या सूर्यप्रकाशात ठेवून स्वच्छ करून वापराव्यात. धान्य साठवणीमध्ये धान्याची पोती जमिनीवर साठवू नयेत. धान्यास ओलावा लागणार नाही, याची काळजी घ्यावी. पावसाळ्यात धान्य हवाबंद ठेवावे. निर्जंतुकीकरण दरवर्षी साठवण जागेतील छिद्रे चुन्याने बुजवून घ्यावीत. धान्य साठवणीची जागा व आजूबाजूचा परिसर झाडून, धुवून स्वछ करावा. सर्व काडीकचरा जाळून नष्ट करावा. सर्व छिद्रे व बिळे काचेचा चुरा भरून नंतर सिमेंटने बंद करावीत. नियंत्रणात्मक उपाय अरासायनिक उपाय

  • धान्य वाळवणे-  धान्य कडक उन्हात वाळवून, धान्याचे तापमान १० ते १२ अंश सेल्सिअसपर्यंत कमी करावे. पोती साठवणूक करताना जमिनीपासून योग्य उंचीवर करावी.  
  • धान्यातील आर्द्रता-  धान्यातील आर्द्रता १० टक्क्यांपेक्षा कमी असल्याची खात्री करूनच साठवण करावी.  
  • चाळणी करणे-  साठवणीपूर्वी व साठवणीच्या काळात शक्य तितक्या वेळेस किडलेले खराब दाणे चाळणी व उधळणीद्वारे वेगळे करून घ्यावे.
  • धान्य साठविण्याच्या घरगुती पद्धती  कडुनिंबाच्या पानांचा वापर कडुलिंबाच्या झाडाची ताजी पाने तोडून ती सावलीत वाळवावी आणि नंतर ती धान्यात मिसळून धान्याची पेटी या पानांसह बंद करावी ही प्रक्रिया सोपी, सुरक्षित आणि प्रभावी आहे. तसेच पोती कडुनिंबाच्या द्रावणात बुडवून नंतर वाळवून घ्यावी अशा उपचारित पोत्यांमध्ये धान्य सुरक्षित राहते. दहा लिटर पाण्यात दहा टक्के कडुलिंबाच्या बिया उपयुक्त ठरतात. वनस्पती तेलाचा वापर बियाणे उपचारित करण्यासाठी परंपरागत कडुनिंबाच्या तेलाचा व एरंडी चे तेलाचा वापर शेतकरी करतात. एक किलो बियाण्यासाठी २० मिलीलिटर तेल पुरेसे असते. या तेलामुळे भुंगे, कीटक, पतंग आणि अनेक प्रकारच्या किडींपासून बियाणे सुरक्षित होते. हळदीचा वापर प्रति एक किलो धान्यात ४० ग्रॅम या प्रमाणात हळदीची पूड टाकून धान्यावर हलके रगडल्यास हळदीचा उग्र वास आणि कीटकनाशक शक्तीमुळे कीटक धान्यापासून दूर राहतात. ग्रामीण महिलांकडून लाल मिरचीची पूडही अनेकदा वापरली जाते. लसणाच्या कुड्यांचा वापर लसणाचे गड्डे पेटीच्या तळाशी ठेवून त्यावर धान्य भरून पेटी बंद करावी. लसणाच्या वासामुळे किडे-कीटक धान्यापासून दूर राहतात. मिठाचा वापर बुरशी आणि जीवाणूंपासून धान्याचे रक्षण करण्यासाठी मीठ उपयोगी ठरते. एक किलो धान्य आणि सुमारे २०० ग्रॅम मीठ एकत्रित करून धान्यासह पोत्यात ठेवावे. त्यानंतर पोते व्यवस्थित शिवून घ्यावे. अर्थात, धान्य टिकविण्याची ही पद्धती चार ते पाच महिन्यांसाठीच फायदेशीर ठरते. चुन्याचा वापर किडींना नियंत्रित करण्यासाठी चुना अत्यंत स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे. एक किलो धान्यात १० ग्रॅम चुन्याचे चूर्ण बनवून धान्यात साठवले जा ते चुन्याच्या वासाने कीटक दूर राहून त्यांची प्रजनन प्रक्रियाही थांबते. राखेचा वापर विशेषतः डाळींची साठवणूक करण्यासाठी मातीच्या भांड्यात तीन चतुर्थांश डाळ आणि उर्वरित भागात गाईचे शेण आणि लाकडाचा भुसा यांचे मिश्रण भरले जाते. सहा महिन्यांनंतर हीच प्रक्रिया पुन्हा केली जाते. काडीपेटीचा वापर फॉस्फरस हे मिश्रण कीटकरोधक असते. सहा ते आठ काडेपेट्या पेटीच्या तळाशी, मध्यात आणि वरील भागातही ठेवल्या जातात. त्यामुळे किडी-कीटक धान्यापासून दूर राहतात. उंदरांचे नियंत्रण पावसाळ्यात शेतातील उंदरांच्या बिळांमध्ये पाणी शिरल्याने ते जवळील घरे, गोडावून किंवा निवाऱ्याच्या ठिकाणी आश्रय घेतात. उंदरांचे पर्जनन खूप जलद गतीने होते. नर मादीच्या एका जोडीपासून आयुष्यभरात ८० उंदरांची पैदास होते.

  • गोदाम, घर आणि शेतात एकाच वेळी उंदीर नियंत्रण मोहीम घ्यावी.
  • दरवाजे घट्ट बसणारे असावेत जेणेकरून उंदीर आतमध्ये शिरकाव करणार नाहीत. दरवाज्याला जमिनीच्या बाजूस पत्रा बसवावा.
  • खिडक्यांना व मोऱ्यांच्या तोंडावर लोखंडी जाळ्या बसवाव्यात.
  • शेतात खोल नांगरट करून बिळे नष्ट करावीत.
  • उंदीर पकडण्यासाठी पिंजरा, सापळा यांचा वापर करावा. शिफारशीत उंदीररोधकांचा वापर करावा.
  • संपर्क- हरिष अ. फरकाडे, ८९२८३६३६३८ (सहायक प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र विभाग, श्री. शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती. )

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

    Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

    Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

    Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

    Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

    SCROLL FOR NEXT