जल-मृद्संधारण आणि वनीकरणातून पर्यावरणाचा समतोल साधता येतो.
जल-मृद्संधारण आणि वनीकरणातून पर्यावरणाचा समतोल साधता येतो. 
ॲग्रो गाईड

उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवड

अखिल भारतीय समन्वित वनशेती संशोधन प्रकल्प,महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.

वनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची निवड करावी. यामध्ये माळरान व टेकड्या, शेतरस्त्याचा काठ, मध्यम व उथळ खोलीची जमीन, नाल्याच्या किनाऱ्यांवर वनवृक्षांची लागवड केली जाते. या लागवडीमुळे जमिनीची धूप थांबविण्यास मदत होते. कृषी वनशेतीमुळे एकाच जमिनीच्या तुकड्यापासून पीक उत्पादनाबरोबर वृक्षांपासून चारा, लाकूड असा दुहेरी फायदा मिळतो. डोंगर-उतारावर झाडांची आणि गवतांची लागवड करावयाची असेल, तर सलग समपातळी चरांची आखणी करावी.

उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवड

  • हिरवा चारा ः सुबाभूळ, अंजन, शिवण, शिरस, खैर, आपटा, कांचन, पांगारा, नीम, पळस, शेवरी, हादगा, बाभूळ.
  • जळणासाठी लाकूड ः निलगिरी, बाभूळ, सुरू, पळस, करंज, हादगा, शेवरी.
  • फळझाडे ः आंबा, चिंच, बोर, आवळा, जांभूळ, सीताफळ, पेरू.
  • औद्योगिक उत्पादन ः नीम, बाभूळ, तुती, करंज, धावडा, निलगिरी, बांबू, एरंड.
  • लाकडासाठी झाडे ः साग, नीम, बाभूळ, शिरस, सुरू, काशीद, करंज, शिवण.
  • जैविक इंधन ः करंज, वन एरंड, महुआ, जोजोबा, सीमारुबा.
  • विविध जमिनींसाठी उपयुक्त वृक्ष
  • हलक्‍या व उथळ जमिनी ः अंजन, सुबाभूळ, सिसू, बाभूळ, सिरस, शेवरी, कडुलिंब.
  • पाणथळ जमिनी ः गिरिपुष्प, सुरू, भेंडी, करंज, शेवरी, निलगिरी.
  • क्षारयुक्त जमिनी ः वेडी बाभूळ, बाभूळ, कडुलिंब, सिसू, निलगिरी, करंज, खैर.
  • डोंगराळ जमिनी ः निलगिरी, बाभूळ, सुबाभूळ, सौंदड, कडुलिंब.
  • - ०२४२६-२४३२५२, अखिल भारतीय समन्वित वनशेती संशोधन प्रकल्प,महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी. - ०२३५८ -२८३६५५, वनशास्त्र महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

    Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

    Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

    Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

    Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

    SCROLL FOR NEXT